डेक्कन व कोलकाताच्या यशाची दिल्ली पुनरावृत्ती करेल का?

Deccan Chargers - Delhi Capitals - Kolkata Knight Riders

दिल्लीचा (Delhi Capitals) संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात खेळत आहे. 13 प्रयत्नात पहिल्यांदाच त्यांनी इथपर्यंत मजल मारली आहे. आणि फायनलच्या पदार्पणातच ते यशस्वी ठरले तर आयपीएलच्या इतिहासात 2012 नंतर पहिल्यांदाच कुणी संघ पहिल्यांदाच आयपीएल खेळुन यशस्वी ठरेल.

2008 मध्ये आयपीएलला सुरुवात झाली. त्या पहिल्याच स्पर्धेत राजस्थान राॕयल्स विजेते ठरले होते आणि चेन्नई उपविजेते होते. पण पहिलीच स्पर्धा असल्याने पदार्पणातच यश असे त्याला म्हणता येणार नाही. पण 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सचा (Deccan Chargers) संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता आणि ते फायनलच्या पदार्पणात विजेते ठरले होते.

डेक्कनचा हा विक्रम 2012 मध्ये गौतम गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) संघानेही केला. त्याच्याआधी ते कधीही आयपीएलच्या फायनलमध्ये खेळले नव्हते पण 2012 ला पहिल्यांदाच फायनल खेळताना त्यांनी चेन्नईला नमवत विजेतेपद पटकावले होते.

2016 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा संघसुध्दा पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचून यशस्वी ठरला होता पण सनरायजर्स हाच आधी डेक्कन चार्जर्स संघ होता. त्याप्रकारे आता खऱ्या अर्थाने 2012 नंतर दिल्ली कॕपिटल्सला इतिहास घडवायची संधी आहे.

2009 मध्ये बंगलोर, 2010 मध्ये मुंबई, 2014 मध्ये पंजाब, 2017 मध्ये रायझिंग पूणे हे पहिल्यांदाच फायनल खेळले होते पण त्यांना यश मिळाले नव्हते. आता दिल्ली कॕपिटल्स त्यांच्या पंक्तीत बसते की डेक्कन वा कोलकाता या पदार्पणातील यशस्वी संघांच्या पंक्तीत बसतो हेच बघायचे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER