मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री ८.३० वाजता संवाद साधणार; लॉकडाऊनची घोषणा करणार?

Uddhav Thackeray

मुंबई :- महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री ८.३० वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन संदर्भातील घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांनी  मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यास संभाव्य नियम…
१) ब्रेक द चेन हा राज्य सरकारचा लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ८.३०  वाजता घोषित करू शकतात.
२) या ब्रेक द चेन लॉकडाऊनमध्ये केंद्राने लॉकडाऊन लावताना ज्या चुका केल्या, त्या टाळण्याचा प्रयत्न.
३) हा लॉकडाऊन १५ दिवसांचा असू शकतो, यामध्ये केवळ आपत्कालीन सेवा सुरू  राहतील.
४) मॉल्स, दुकाने बंद होऊ शकतात; पण जीवनावश्यक वस्तूंची दुकानांना परवानगी असू शकते.
५) किराणा माल, भाजीपाल्याची दुकानं सुरू राहण्याची शक्यता.
६) जिल्हानिहाय बेडची संख्या दोन-तीन दिवसांत वाढवण्याची शक्यता.
७) जिल्हापातळीवरच्या सीमा बंद केल्या जाऊ शकतात.
८) मुंबई लोकलबद्दल सध्या विचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button