२०३० पर्यंत बिटकॉईन पार करेल १ कोटींचा टप्पा ?

Maharashtra Today

जगभरातील तमाम देशांचे आपआपले चलन आहेत. कुठं डॉलर तर कुठं रिआल तर कुठं पाउंड या नावाने त्यांच्या मुद्रा आहेत. या सर्व चलनाच्या किंमती एकमेकाच्या विसंगत आहेत. जसं की भारतातले ७० ते ८० रुपये म्हणजे अमेरिकेचा एक डॉलर. तोच हिशोब पाउंड आणि रियाल सोबत बदलतो. काही देशांच्या चलनापेक्षा भारतीय चलनाचे मुल्य जास्त आहे. परंतू जगात असं ही एक चलन आहे ज्याचं एक नाणं मिळवण्यासाठी आपल्याला तब्बल ४५ लाख रुपये मोजावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारात वापरलं जाणारं हे चलन ‘बिटकॉईन’ या नावानं ओळखलं जातं.

एका नाण्यासाठी मोजावे लागातात ३० लाख रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारात आढळणाऱ्या ‘बिटकॉईन’ची (Bitcoin)ताजा किंमत भारतीय बाजारात सद्याच्या स्थितीला ३० लाख्यांच्या घरात आहे. एका बिटकॉईनसाठी तब्बल ३० लाख मोजावे लागत असल्यामुळं ती जगातली सर्वात महाग करन्सी असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपुर्वी बिटकॉईननं ४५ लाखांच्या घरातपर्यंत मजल मारली होती.

जुलै २०२० मध्ये बिटकॉईन भारतात आलं चर्चेत

भारतात पहिल्यांदा सर्वाधिक चर्चेत बिटकॉईन आलं होतं ते जुलै २०२० मध्ये. अमेरिकेतल्या अब्जाधिशांचे ट्वीटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांसोबतच अमेरिकेतल्या अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स एका सायबर हल्ल्याद्वारे हॅक करण्यात आले होते. या हल्ल्याला बिटकॉईन स्कॅम असं नाव देण्यात आलं होतं. यातून बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली होती. याचे जगभर पडसाद उमटले. भारतातही यावर प्रतिक्रिया व्यक्त होणं साहाजिक होतं तेव्हाच भारतात सर्वाधिक बिटकॉईन चर्चिलं गेलं.

काय असते क्रिप्टो करन्सी

बिटकॉईन समजण्यासाठी सर्वात आधी आपण क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. चलनातल्या नोटांना पर्याय म्हणून अस्तित्त्वात आणलेली एक डिजीटल किंवा व्हर्च्युअल करन्सी अशी बिटकॉईनची व्याख्या करता येईल. भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखं हे छापील नसतं. कोणत्याही देशाचं सरकार किंवा बँक हे चलन ‘छापत’ नाही. क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंग करुन या या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. ज्या प्रकारे जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलनं आहेत, अगदी तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत.

उदाहरणं द्यायचं झालं तर बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश अशी नावं घेता येतील. यापैकी बिटकॉईन सर्वात जुनी करन्सी असून ती काही दशकांपुर्वी बाजारात आली होती.

२०३० पर्यंत बिटकॉईन पार करेल १ कोटींचा टप्पा

आकडेवारीकडं लक्ष दिलं तर बिटकॉईनची किंमत २७१ कोटींनी वाढलेली दिसते. तज्ञांच्या मते २०३० पर्यंत बिटकॉईनची किंमत एक करोड पर्यंत पोहचेल. येत्या काळात बिटकॉईनच्या किंमतीत अजून वाढ होऊ शकते. भारतात बिटकॉईन खरेदी केलेले ५० ते ६० लाख बिटकॉईन वापणारे लोक आहेत. येत्या काळात त्यांची संख्या वाढू शकत असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button