बिल- मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाचा त्यांच्या फाउंडेशनवर परिणाम होईल का?

Maharashtra Today

जगातला सर्वात महाग घटस्फोट म्हणून बील आणि मेलिंडा गेट्स (Bill-Melinda Gates)यांच्या घटस्फोटाकडे( Divorce ) पाहिलं जातंय. लग्नाच्या २७ वर्षानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. “एकमेकांचे जोडीदार म्हणून आम्ही एकत्र राहू शकत नाही” अस सांगत या दांपत्यानं वेगळं व्हायाच निर्णय घेतला. बिल गेट्स यांनी ट्वीट करतही खबर सर्वांपर्यंत पोहचवली. तीन मुलांनी दोघांनी वाढवलं. समााजिक हिताची अनेक कामं त्यांच्या संस्थेनं पार पाडली आहेत. बीड आणि मेलिंडा यांच्या घटस्फोटाची बातमी नेटकऱ्यांसाठी धक्कादायक मानली जाते आहे.

सामाजिक जबाबदाऱ्या

बिल गेट्स बराच काळ जगातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्या संपत्तीतला मोठा हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी खर्ची घातला. साथीच्या आजारांनी त्रस्त मुलांच्या आरोग्यावर, लसीकरणासाठी या संस्थेने पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. गिव्हिंग प्लेज सुरू करण्यात बिल-मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफे यांचा पुढाकार होता. गिव्हिंग प्लेज म्हणजे उद्योगपतींकडून सामाजिक कार्यासाठी पैशाच्या रुपात दिलं जाणारं भरीव योगदान. फोर्ब्स मासिकानुसार, 124 बिलिअन डॉलर इतक्या प्रचंड संपत्तीचे मानकरी बिल जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत.

बिल गेट्स यांनी 70च्या दशकात मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट ही अग्रगण्य कंपनी समजली जाते. या कंपनीच्या माध्यमातून बिल यांना पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळालं. यातून मिळवेलेलं ऐश्वर्य अशा पद्धतीनं त्यांनी सामाजिक कामांसाठी खर्च केली यात त्यांच्या पत्नी मेलिंडा यांची त्यांना साथ लाभली आहे.

सामाजिक कार्यासाठी मायक्रोसॉफ्टचा दिला राजीनामा

बिल गेट्स यांनी स्वतःला पुर्णपणे तंत्रज्ञानाच्या दुनियेत झोकून दिलं होतं. अनेकदा त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं विकसनशील देशांनी मोठमोठ्या नैसर्गिक अपत्तींवर मात केल्याची उदाहरणं अजून ताजी आहेत. नंतर एका टप्प्यावर आल्यानंतर त्यांनी समाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्यासाठी बिल यांनी गेल्याच वर्षी मायक्रोसॉफ्टमधील कामाचा राजीनामा दिला होता. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे जगभरात नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या गरीब देशांना वेळोवेळी मदत पुरवली जाते.

कोरोनाशी लढण्याऱ्या राष्ट्रांना कोरोनाची लसच वाचवू शकते. यासाठी लस उपलब्ध होणं गरजेचं आहे. यासाठी लागणाऱ्या मोठ्या आर्थिक खर्चाचा भार बिलगेट्स यांनी उचलला. कोरोनावरची ऑक्सफर्ड अस्ट्राझेनेकाची लस भारतात आणण्यासाठी गेट्स फाउंडेशनने मोठा निधीही गावी अलायंस या जागतिक लस निर्मिती संघटनेला उपलब्ध करून दिला. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गेट्स फाउंडेशन आणि गावी आलायंसने १० कोटी लशींचे डोस तयार करण्यासाठी १५ कोटी डॉलर्स एवढी रक्कम देऊ केली होती. यामुळं भारतात आज होत असलेल्या लसीकरणा मागं त्यांचं महत्त्वाचं योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं.

तरी एकत्र काम करणार

पती पत्नी म्हणून गेट्स दांपत्य विभक्त होत असलं तरी दोघांनीही एकत्रीत सामाजिक कार्य सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ‘बिल- मेलिंडा फाउंडेशन’ यापुढंही तितक्याच प्रभावीपणे काम करेल असं दोघांनी सांगितलंय. ‘आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आम्ही आहोत, आमच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्यात यावा’ असं ते म्हणालेत. भारतासह जगभरात त्यांनी केलेल्या कामांमुळं विकसनशील देशांना विकासाच्या मुख्यप्रवाहात टिकून राहणं शक्य झालं. त्यांच्या घटस्फोटामुळं सामाजिक कार्यांवर परिणाम होणार नसल्याची बाब सकारात्मक आहे.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button