भारतरत्नांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा, महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!

Ashish Shelar & Uddhav Thackeray.jpg

मुंबई : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्वीट करणाऱ्या भारतातील सेलिब्रिटीच्या ट्वीटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. आणि यावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यानांही लक्ष्य केले आहे.

ज्या पद्धतीचे ट्विट सचिन तेंडुलकर आणि लतादीदींनी केले ते कुणाच्या बाजूने नाही तर ते आम्ही सारा देश एक आहोत असा संदेश देणारे आहे. आम्ही सगळे एक आहोत असे म्हटल्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, राजू शेट्टी यांच्या पोटात का दुखले? आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले.

कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!, असे म्हणत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER