लवकरच परत येईन – डोनाल्ड ट्रम्प

DONALD TRUMP ON ECONOMY

वॉशिंग्टन : कोरोनाच्या (Corona) तडाख्यात सापडलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅरिलँड येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त  करण्यात येते आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करून म्हटले आहे – कोरोनावर मात करून मी लवकरच परत येईन.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पत्नी मेलेनिया ट्रम्प दोघांनाही कोरोना झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एक महिना उरला असताना ट्रम्प यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यांच्या प्रकृतीबाबतही चर्चा सुरू होत्या.  म्हणून ट्रम्प यांनी स्वत: व्हिडीओ  जारी केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे – रुग्णालयात दाखल केले तेव्हा प्रकृती ठीक नव्हती. आता मात्र आराम वाटतो. उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा चांगला परिणाम जाणवतो आहे. देवाने केलेल्या चमत्कारासारखीच ही औषधे आहेत. काही दिवस प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. माझ्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.

आपणा सर्वांना अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवायचे  आहे. मी लवकरच पुन्हा परतणार असून निवडणुकीचा प्रचार पूर्ण करायचा आहे. कोरोनाबाबत ते म्हणाले – लाखो जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वच बाधित कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोना फक्त अमेरिकेत नसून संपूर्ण जगात पसरला आहे. मी संपूर्ण जगातील कोरोनाबाधितांसाठी लढतो आहे. सध्या मला देण्यात येणारी औषधे एखाद्या चमत्कारापेक्षाही कमी नाहीत. अनेक जण माझ्यावर टीका करतात. मात्र, खरंच हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या प्रकृतीतही सुधारणा होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER