लवकरच आघाडी सरकारकडून ‘संभाजीनगर’वर शिक्कामोर्तब होणार – सुभाष देसाई

Sambhaji Nagar - Balasaheb Thackeray - Subhash Desai

औरंगाबाद :- शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामकरण संभाजीनगर (Sambhaji Nagar) असे करून टाकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अलीकडेच औरंगजेब सेक्युलर होता का? असा प्रश्न उपस्थित केला. लवकरच महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करणार आहे असा दावा पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी आज औरंगाबादेत व्यक्त केला. आज संभाजीनगर शहरातील अमरप्रीत चौकातील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते.

शहराच्या नामकरणावरून मागील काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधारी शिवसेनेत वाद रंगला आहे. औरंगाबाद की संभाजीनगर यावरून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सुद्धा विरोधकांनी या मुद्यावरून कोंडीत पकडले आहे. कॉंग्रेसने संभाजीनगर नावावरून जाहीर विरोध केल्यानंतर शिवसेनेने संयमी भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रसने याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेईल. तीनही पक्षांचे जेष्ठ नेते यावर जे निर्णय घेतील तो सर्व मान्य असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत मतभिन्नता आहे असे आरोप विरोधक करताना दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. लवकरच शहर नामकरणासाठी महाविकास आघाडी संभाजीनगरचा प्रस्ताव आणेल असे त्यांनी म्हटले आहे. प्रस्ताव आणून महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण होत आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ही बातमी पण वाचा : संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा… ;  शरद पवारांनी मांडले  नामांतरावर परखड मत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER