
मुंबई :- सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केला. सचिन वाझेने या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी २ कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तसेच वाझेने आपल्या पत्रात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे नाव घेतले आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?, असा सवाल पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. सोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाझे हे हिमनगाचं टोक आहे. मुख्य सूत्रधार वेगळाच आहे, हे हँडलर्स कोण आहेत. ते बाहेर येणं महत्त्वाचं आहे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. या सर्व गोष्टी आता लवकर बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का ? @OfficeofUT
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 7, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला