पुण्यातील उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अजितदादांची जादू चालणार?

Ajit Pawar - Pune Mahanagar Palika - maharastra Today

पुणे :- पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची निवडणूक येत्या 6 एप्रिलला संपन्न होणार आहे. ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने होणार असून, या निमित्ताने भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकणार आहे. भाजप आणि रिपाईंकडून सुनीता वाडेकर रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या लता राजगुरु यांनी अर्ज दाखल केला आहे.

पुणे महापालिकेत एकूण १६४ नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक ९९ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र आधी सांगली आणि मग जळगावात बसलेल्या धक्क्यानंतर, भाजप आता सावध पावलं टाकत आहे. सांगलीत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत, महापौर निवडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला. तर जळगावात शिवसेनेने सर्जिकल स्ट्राईक करत भाजपला धोबीपछाड दिली. त्यामुळे आता पुणे महापालिकेत अजित पवार (Ajit Pawar) काही जादू करतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

दुसरीकडे भाजपला उपमहापौरपदापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं जय्यत रणनीती आखली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने होत आहे. भाजपा आणि रिपाई या दोन्ही पक्षांनी मिळून उपमहापौरपद हे अडीच अडीच वर्षांसाठी ठरवलं होतं, मात्र भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर रिपाईंला खूश करण्याचा प्रयत्न केलाय आता ६ तारखेच्या निवडणुकीत अजित पवार काय जादू घडवून आणतात हे पाहणं महत्वाचं असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button