आदर पूनावाला यांना सुरक्षा देणार का? संजय राऊत म्हणाले…

Adar Poonawaala - Sanjay Raut - Maharashtra Today

मुंबई :- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी आपल्याला मुख्यमंत्री ते उद्योजक अशा अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांना जर धमकी दिली जात असेल तर गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आदर पूनावाला यांची सुरक्षा करणं सर्वांची जबाबदारी आहे. ते जनतेच्या सुरक्षेसाठी, देशासाठी काम करत असून त्यांची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही. महाराष्ट्राची ती परंपराच नाही. किंबहुना महाराष्ट्रालासुद्धा या गोष्टीचा गर्व राहील की देशाची आरोग्यविषयक सुरक्षा निर्माण करणारे किंवा देशाला आरोग्यविषयक कवच-कुंडल देणारी जी लस आहे त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते आहे, असे राऊत म्हणाले.

ही एक राष्ट्रभक्तीची भावना महाराष्ट्रात कायम राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही नेते, राजकीय पक्ष अशा प्रकारच्या धमक्या देणार नाहीत. जर कोणी करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने खोलवर तपास करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : अदर पुनावालांच्या जीवाला धोका, प्रतिष्ठीत टिव्ही पत्रकारानं घेतलं शिवसेनेचं नाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button