मेट्रोच्या चाचणीसाठी गर्दी जमावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई होणार? मुंबईकरांचा सवाल

CM Uddhav Thackeray Flags Off Trial Run For Mumbai Metro

मुंबई :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) (MMRDA) च्या डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांची चाचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) हस्ते सोमवारी झाली. कोरोनाचे (Corona) निरबंध लागू असताना यासाठी मोठी गर्दी जमली होती. यावरून भाजपासह अनेक नागरिकांनी प्रश्न विचारला आहे – मेट्रोच्या चाचणीसाठी गर्दी जमावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई होणार?

पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाण पुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचे ई लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली.!

मुख्यमंत्री गर्दीसंदर्भात चिंता व्यक्त करत असताना या उद्घाटन सोहळ्याला झालेल्या गर्दीवरुन अनेकांनी सोशल नेटवर्कवर प्रश्न उपस्थित केले. उद्धटनासाठी मेट्रो स्थानकावर गर्दी जमावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई होणार का?

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी ही बंधने अजून उठवलेली नाहीत. करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. पण मुंबईतील आजची गर्दी चिंताजनक आहे. अशीच गर्दी राहिली तर पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना दिला. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला आलेले तेथील गर्दीचे फोटो व्हायरल झाले.

मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांवरील वाहतुककोडींसंदर्भात चिंता व्यक्त केल्यानंतर मुंबई भाजपानेही मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला – “धक्का आम्हालाही बसला मेट्रो ट्रायलच्या कार्यक्रमाला तुम्ही जमवलेली गर्दी पाहून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महोदय. फेसबुकवर सतत ‘गर्दी करू नका’असे आवाहन करणारा मुख्यमंत्री हाच का? असा सवाल उभा राहिला आमच्या मनात. तोंडाच्या त्या वाफा फक्त जनता जनार्दनासाठी असतात का?

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button