गर्दी केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल होणार का? मनसेचा सवाल

Mumbai Metro

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि सुस्साट होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. जेवढी गर्दी मेट्रोमध्ये जाण्यासाठी नसते तेवढी गर्दी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर मनसेच्या (MNS) नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल (Ganesh Chukkal) यांनी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील दाखविला त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत मेट्रो स्थानकावर झालेली गर्दी भाऊगर्दी म्हणून संबोधले आहे. ”लोका सांगे ब्रह्मज्ञान… मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना नियमांना हरताळ फासला जातोय, मग त्याचं खापर लोकांवर कशाला फोडताय? मेट्रो चाचणी उद्घाटन कार्यक्रमाला गर्दी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button