विकिपीडिया भारतात होणार बंद होण्याची शक्यता

Wikipedia

नवी दिल्ली : इंटरनेटवरील माहितीचा सर्वात मोठा भंडार म्हणजे विकिपीडिया (Wikipedia) वर शालेय किंवा कॉलेजमधील प्रोजेक्टसाठी लागणारी किवा ऑफिसमधील एखाद्या प्रेझेंटेशनसाठी लागणारी माहिती विकीपीडियावर सहज मिळते. मात्र इंटरनेटवरील मोफत माहितीचा हा भंडार आता भारतीयांसाठी बंद होण्याची शक्यता आहे.

एल्गार परिषद खटला; ९ आरोपींना मुंबईच्या कारागृहात हलविले

विकीपीडिया वेबसाईट विकीमीडिया फाऊंडेशनच्या अंतर्गत चालवली जाते. या कंपनीच्या भारतातील संवाद संचालक अनुशा अलिखान यांनी एका मुलाखतीत हि शक्यता वर्तवली आहे.

विकिपीडियाचा भाषा आणि विषय केंद्रित आहे. कुठल्याही भौगोलिक रचनेवर आधारीत नाही. जगात कोणालाही कुठूनही या वेबसाईटवरील माहिती एडिट करता येते. मात्र ही सोय कदाचित भारतातील काही लोकांना मान्य नाही. परिणामी विकीपीडियावरील माहिती बाबत ते वारंवार विरोध दर्शवतात. तसेच माहिती एडिट करण्याची सोय बंद करावी अशीही मागणी हे लोक करतात. मात्र केवळ भारतीयांसाठी एडिट करण्याची सोय बंद करता येणार नाही. यापेक्षा भारतात विकीपीडिया बंद करणे जास्त सोयीस्कर ठरेल.