वाळवणे गावात पत्नी सरपंच, पती उपसरपंच!

Sarpanch & Deputy sarpanch

अहमदनगर : पारनेर तालुक्यातल्या वाळवणे गावात सरपंच म्हणून जयश्री पठारे आणि उपसरपंच म्हणून तींचे पती सचिन पठारे यांची निवड झाली आहे. इथे सरपंचपद महिलेसाठी आरक्षित होते.

वाळवणे गावची लोकसंख्या दोन हजार आहे. ग्रामपंचायतमध्ये नऊ जागा होत्या. चार जागी बिनविरोध निवड झाली. उर्वरित जागांसाठी निवडणूक झाली. सचिन पठारे आणि जयश्री पठारे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. दोघांचीही बिनविरोध निवड झाली. त्यानंतर ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण आले. सचिन पठारे दहा वर्षांपासून गावात सामाजिक कार्य करत आहेत त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाली. ग्रामपंचायतवर महिला आरक्षण असल्याने जयश्री पठारे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER