या पाच गोष्टी बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नये !

happy relation

नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास एक महत्वाचा पाया आहे. असे असले तरी, बायकोने जाणीवपूर्वक नवऱ्यापासून काही गोष्टी लपविल्यास त्यांचे नाते दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी.

Happy Relationship

१) वैयक्तिक सेविंगबद्दल बायकोने कधीच सांगू नये. विशेषतः ज्यांच्या नवऱ्यांना निरर्थक खर्च करण्याची सवय असते, अश्यांनी तर मुळीच सांगू नये. बायकोने वाचवून ठेवलेले हे पैसे कठीण प्रसंगी कामी येवू शकते. यामुळे कठीण प्रसंगी इतरांसमोर हात पसरविण्याचा वेळ येणार नाही.

२) लग्नाआधी जर बायकोचे एखादे अफेअर असेल तर ते नवऱ्याला कधीच सांगू नये. तो एक भूतकाळ होता परंतु नवऱ्याला याबद्दल सांगितल्याने बायकोबद्दलचा संशय वाढू शकतो. बायकोचे आधी असलेले अफेअर जर नवऱ्याला पचविणे जड जाणार असेल तर यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनाची घडी विस्कटू शकते. तसेच जर एखादा जवळचा पुरुष मित्र असेल तर त्याबद्दलही फार काही सांगणे व वारंवार त्याचे नाव नवऱ्यासमोर घेणे बायकोने टाळावे. पुरुष आपल्या पत्नी बद्दल अधिक पझेसिव्ह असतात. अश्यावेळी त्यांच्या मनात नको तो संशय बळावण्याची शक्यता असते.

ही बातमी पण वाचा : पती करतात ‘या’ ५ कारणांमुळे पत्नीवर संशय

३) बायकोने आपल्या सासरच्या मंडळींबद्दल वाईट बोलणे टाळावे. यामुळे विषयाचा अपव्यय होऊन कलह वाढू शकतो.

४) आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये नवऱ्याच्या वाईट किंवा न पटणाऱ्या सवयीनबद्दल टीका करणे कटाक्षाने टाळावे. यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावू शकतो. चार भिंतीतल्या गोष्टी चार भिंतीतच राहाव्या याची काळजी घ्यावी.

५) अकारण पतीवर अविश्वास दाखवू नये, कारण पति-पत्नीचे नाते हे विश्वासावर टिकून असते. अकारण अविश्वास दाखविल्यास पति अनेक महत्वाच्या गोष्टी लपविण्याचा शक्यता बळावते.

ही बातमी पण वाचा : ‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम