आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते? मनसेचा राऊतांना प्रश्न

Sanjay Raut-Sandeep Deshpande

नवी दिल्ली :- मागील १० दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. उद्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनंही पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नामोल्लेख टाळत राऊतांवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी याची घोषणा केली होती. शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राऊत यांचा नामोल्लेख टाळत खोचक सवाल उपस्थित केला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती, आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER