भाजपने शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंना का दूर ठेवले ?

Representational Pic

मुंबई : मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या शिवस्मारकाचं भाजप सरकार राजकारण करत असल्याचं नुकताच सामना च्या अग्रलेखात छापून आलं आहे. सोबतच शिवसेनेचे आयकॉन (शिवाजी महाराज) याचं राजकारण करून भाजपने मागील दोन वर्षांपासून सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन करण्याच्या काही तासापूर्वीच विल्सन कॉलेज जवळ १८ शिवसैनिक गिरगांव चौपाटीवर एकवटले होते. यावेळी गिरगांव चौपाटीला एखाद्या सिनेमातील सेट सारखं सजवण्यात आलं होत. संपूर्ण मरिन ड्राईव्हवर भगवे झेंडे फडकवण्यात आले होते. तसेच सर्वच स्थानिक रेडिओमध्ये शिवस्मारक भूमिपूजनाची जाहिरात वाजत होत्या.

या सोहळ्याला उपस्थित राहावं ही शिवसैनिकांसाठी मानाची बाब होती. या सोहळ्याचं कुठलच व्हीआयपी पास शिवसैनिकांना मिळाले नव्हते. परंतु मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं जगप्रसिद्ध शिवस्मारक बनण्याचा हा सोहळा असल्यानचं पक्ष सुद्धा नतमस्तक होता. परंतु दोन तास ताटकळत राह्ल्यानंतर मात्र शिवसैनिकांन सोबत जे झाले, ते फार अपमानास्पद होते. पोलिसांच्या मोठय़ा गाडय़ा तेथे आल्या आणि पोलिसांनी चौपाटीबाहेर उभ्या असलेल्या १८ शिवसैनिकांना गाडीत टाकून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना एक तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यां मध्ये एक दक्षिण मुंबई मधील नगरसेवक गणेश सानप सुद्धा होते.

यावेळी नाराज झालेले सापन म्हणालेत, त्याठिकाणी भाजपचे सुद्धा कार्यकर्ते उपस्थित होते, परंतु भाजपच्या एकाही कार्यकर्त्यांला ताब्यात का घेण्यात आलं नाही. भाजप आणि शिवसेनेसाठी कायदा वेग वेगळा आहे का ? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. आमचा गुन्हा काय होता? आणि मला ते ताब्यात कस घेऊ शकतात? जनतेनं निवडून दिलेला मी एक लोकप्रतिनिधी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असल्यानेच मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत सोहळा पाहण्यासाठी त्याठिकाणी उभा होतो.

आणखी एक शिवसैनिक कोल्हापूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक कृष्णा पोवले म्हणालेत, आम्ही शिवसैनिक त्या ठिकाणी चुपचाप सोहळा सुरु होण्याची प्रतीक्षा करत होतो, त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ता सुद्धा पक्षाचा झेंडा घेऊन उपस्थित होते. परंतु त्यांना हाथ सुद्धा लावण्यात आला नाही.

संपूर्ण दक्षिण मुंबईत या सोहळ्याच्या एक दिवसापासूनच चर्चेचं वातावरण होत. एका रथाला सजवून महाराष्ट्रातील विविध नद्यांचं पाणी एका पात्रात या रथात ठेवण्यात आलं होत. महाराष्ट्रातील या विविध नद्यांचं पाण्यानी ३६०० कोटी खर्चाचं तयार होणाऱ्या शिवस्मारकच्या ठिकाणी अभिषेक करणार होते. त्या शनिवारच्या कार्यक्रमाला भाजपने ‘हायजॅक’ केले होते. त्याच पूर्व संध्येला भाजपचे दोन मंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना भेटायला ‘मातोश्री’ वर आलेत आणि उद्धव ठाकरे याना शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यात सामील होण्याचं निमंत्रण दिल. शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी त्यांचं ‘आयकॉन’ बळकावतील या अस्वस्थेत होते.

चौपाटीवर दक्षिण मुंबई चे शिवसेनेचे नेता आणि विभाग प्रमुख पांडुरंग सकपाल हे सुद्धा उपस्थित होते. ते म्हणालेत, आमच्या जवळ या कार्यक्रमाचं पास नव्हतं, म्हणून आम्ही चौपाटी जवळ शांतपणे उभे होतो. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर मला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मी यावेळी त्यांना अनेकदा विचारलं आमचा गुन्हा काय आहे? परंतु मला काहीच उत्तर मिळालं नाही. यावेळी मी त्यांना म्हणालो मला हाथ सुद्धा लावलं तर याचा परिणाम वाईट होणार .त्यामुळं त्यांनी मला हाथ सुद्धा लावला नाही, परंतु यामुळं पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड चिडले होते.

सापन यांनी सांगितलं, ताब्यात घेतल्या नंतर आमचा पोलिसानं सोबत वाद ही झाला. मी पोलिसांना हे सुद्धा विचारलं की कोणाच्या सांगण्यावर ते हे करताहेत? आम्ही इथे फक्त शिवस्मारक भूमिपूजन सोहळा आणि सोहळ्यात उपस्थित पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे याना पाहायला आलो आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतो, मागील पाच शतकापासून आम्ही शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो आहे. ते म्हणालेत, ‘भाजप ने तर आज शिवाजी महाराजांना ओळखलंय’. त्यांनी भाजपला प्रश्न विचारलाय, पूर्ण शहरात शिवस्मारक भूमिपूजनाच निमंत्रण का चिपकवलं? जर विना निमंत्रणाचं या सोहळ्याच्या जवळपास येऊ द्यायचं नव्हतं तर.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित होऊन, १९९६ ला शिवसेनच गठन करण्यात आलं होत. हे नाव बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकर ठाकरे यांनी सुचवलं होत. “शिवाजी महाराजांची ही सेना” तेव्हापासूनच विविध गटात १७ वी शतकातील मराठा राजा यांच्या शासन पद्धतीचे प्रतिपादक बनले आहे. शिवाजी महाराज्यांच्या प्रति समर्पित संघटन आणि शिवसैनिक, उद्धव ठाकरे यांच्या प्रति सुद्धा तेवढेच विश्वासू आहेत. पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात ते उपस्थित असतात. शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी च्या रूपात ते आपल्या जागेची निगराणी सुद्धा चोकपणे करतात.

छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचे वारसा, भाजप आपल्या ताब्यात करण्याचा प्रयत्न करत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोट्या मतांनी विजय मिळवून भाजपने विधानसभेची निवडणूक मोहीमेत “छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ” या नारेबाजीचा फलक सुद्धा लाँच केलं होत. सप्टेंबर २०१४ मध्ये सोबत विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दोन्ही पक्षात युती होण्याच्या पूर्वी हा नारा, पोस्टर आणि होर्डिंग्सच्या माध्यमातून पूर्ण मुंबईत वाटण्यात आले होते. यावेळी भाजपने इशारा ही दिला होता कि, ते एकटेच निवडणूक लढू शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादी पासून चिंतेत येऊन, भाजपने शिवसेनेपासून त्यांचं आयकॉन ‘शिवाजी महाराज’ घेऊन निवडणुकी प्रचारात शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग केला होता. मोट्या चालाकिने शिवसेनेच्या “आयकॉन”च्या भरवश्यावर भाजपने विजय मिळवला होता. आणि शिवसेना मात्र मागेच राहिली.

विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ नाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपकडे एकही असा चेहरा नव्हता जो अख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सुद्धा गुजरातचे असल्याने महाराष्ट्रात मराठी माणूस आणि त्याचा प्रभाव भाजपला जिंकून आणण्यात मदत करेल आणि मराठा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी असं होते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचं नाव . मग शिवाजींच्या नावाने भाजपने निवडणूक लढवत भरघोस मतांनी विजय मिळवला. याआधी मराठा मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, असं एका बीजेपी नेत्याचं म्हणणं आहे.

पूर्वी भाजप पक्ष बनिया आणि ब्राम्हण लोकांचा असल्याचं ओळखल्या जायचं. मात्र भाजपने शिवाजी महाराजांचं नावाचा वापर करत शिवसेनेच आइकॉन आपल्याकडे बळकावून भाजपने महाराष्ट्रात मराठी लोकांना आपल्याकडे वळवून घेतलं. आता होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचा भाजपला, शिवसेना आणि मनसे प्रमाणेच फायदा होणार आहे. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या प्रत्येक भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात. तसेच प्रत्येक कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा उल्लेख अथवा त्यांच्या नावाने भाजपने कार्यक्रम घ्यायला सुरवात केली आहे.

तसेच १ मे ला सुद्धा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ “महाराष्ट्र दिनाचा ” कार्यक्रम घेतला. नुकताच राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने मुंबई विमानतळाच्या नावात “महाराज” हा शब्द जोडला. एकप्रकारे शिवाजी महाराजां विषयी भाजपला किती आदर आहे हे, दाखवण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे.

२४ डिसेंबरला पार पडलेल्या शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याला शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे याना भाजपने निमंत्रण दिले नाही. कुठंलच वाद निर्माण होऊ नये यासाठी बाबासाहेब पुरंदरे याना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या “राजा शिवछत्रपती” या पुस्तकातील काही विधानांमध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीची माहिती दिली आहे, असे मराठा लोकांचे मत असून यावर वादळ निर्माण झाले होते. परंतु शिवसेनेने बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केलं होत.

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यानच्या स्थानकाचे नाव राज्य सरकारने राममंदिर ठेवण्याचं ठरवलं. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षानं याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला यावरूनच तिढा निर्माण झाला. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे म्हणालेत, या रेल्वे स्थानकाचे नाव राममंदिर ठेवावं यासाठी मी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू याना पत्र लिहिलीत , याचा पाठपुरावा केला. सरकारी महसूल विभागत या परिसराची नोंद राम मंदिर च्या नावानेच आहे. गजानन कीर्तिकर म्हणालेत , मला जेव्हा माहिती झालं याकरिता शासनाची आणि मंहानगरपालिकेची शिफारस लागते तेव्हा मी याचा पाठपुरावा केला. त्यामध्ये राम हे नाव होत म्हणून राजकारण करण्यात आलं. आणि संपूर्ण श्रेय भाजपने आपल्याकडे लाटला. सोबतच रेल्वे स्थानकाचे नाव बदलताना ही भाजपने पोस्टरबाजी करत संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणालेत.

शिवसेनेच्या काही नेत्यांच्या म्हणण्या नुसार, आम्ही भाजपकडून रामाचा किंवा मंदिराचा मुद्दा हिसकावून घेतला नाही. मात्र ओशेवारा रेल्वे स्थानकाला राम मंदिराचं नाव देण्यात यावं. ही तेथील स्थानकांची दोन शतकापासून मागणी होती. तो मुद्दा फक्त शिवसेनेने पुढे नेवून त्याचा पाठपुरावा केला.

गजानन कीर्तिकर म्हणालेत, भाजप शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण खेळत आहे. काँग्रेस ने सुद्धा आता पर्यंत स्वतःच्या फायद्यासाठी शिवरायांच्या नावाचा वापर केला. आता भाजप सुद्धा तेच करत आहे. शिवसेनेने कधीच शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले नाही असं ते म्हणालेत. सोबतच मागील पाच शतकापासून आम्ही शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावरच चालत आहे.

भाजप आणि शिवसेने मधला मतभेद मोदींसमोर त्यावेळी पुढे आला जेव्हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथ मोदींची रॅली होती. यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाच्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी द्यायला सुरवात केली. यावेळी कार्यकर्त्यांना शांत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत,’आपण सर्वच शिवरायांचे सैनिक आहोत’ आणि त्यांना शांत केलं. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाषण द्यायला सुरवात केली तेव्हा मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत नारेबाजी केली. मात्र यावेळी नरेंद्र मोदींनी भाषणाच्या वेळी साधं, शिवसेनेचा व बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख सुद्धा केला नाही.

मंगळवारी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले, फक्त राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करू नका. शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, जे लोक त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करताहेत, त्यांचं नुकसान होणार.

भाजपचे म्हणणे आहे की, शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गानेच आम्ही आमचं काम करतोय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणालेत, अंतरराष्ट्रीय स्तरावर शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं हा कोणी विचारही केला नव्हता. मात्र भाजपने हे करून दाखवले. पण मात्र काही लोकांनी हे आवडले नाही आहे.

शेलार म्हणालेत, आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा याचा विचार केला होता. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याचा विचार केला नव्हता. आणि मुंबई महानगर पालिकेने सुद्धा ते करून दाखवलं नाही. कायद्याने महानगर पालिका सुद्धा पर्यटक क्षेत्राचा विकास करू शकते. मात्र महानगर पालिकेने ते केले नाही. आम्हाला सुरवातीपासूनच आंतराष्ट्रीय स्तरावरच स्मारक बनवायचं होत असं ते म्हणालेत. आणि मुंबई विमानतळाला नाव सुद्धा माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात देण्यात आलं होत.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजप शिवसेनेची युती होणार यातही शंकाच आहे. पण निवडणुकीच्या वेळी भाजप पुन्हा तेच म्हणणार आहे, कि शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. आणि हे मात्र शिवसेनेला कदापि आवडणार नाही.