कल्पना दत्त या महिला क्रांतीकारीचा इंग्रजांनी का घेतला होता धसका?

Maharashtra Today

‘खेले हम जी जान से’ या हिंदी सिनेमात कल्पना दत्त यांची भूमिका दिपिका पादूकोनने(Deepika Padukone) भुमिका निभावली होती. दिपिकाचं या भूमिकेबद्दल तिचं भरपुर कौतुक करण्यात आलं होतं. बऱ्याच लोकांना या सिनेमामुळं ‘कल्पना दत्त’ (Kalpana Dutt) यांच्या योगदानाची जाणीव झाली असेल. कारण कल्पना दत्त यांच्या पराक्रमाला भारतीय इतिहास पुस्तकांना न्याय देता आलेला नाही.

सध्या बांग्लादेशात असणाऱ्या चाटगावमध्ये १९१३मध्ये श्रीपुर गावामध्ये एका मध्यम वर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण त्यांनी गावीच घेतलं. नंतर त्या कलकत्त्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्या. कलकत्त्यात त्यांचा संपर्क क्रांतीकाऱ्यांशी आला. कलकत्त्यात त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. यानंतर देशाच्या स्वातंत्र संग्रामात कल्पना यांनी कधी उडी घेतली हे कल्पना यांना कळालंच नाही. महाविद्यलायत असताना त्या विद्यार्थी संघनेत सक्रिय होत्या. विद्यार्थ्यांची लहान मोठी कामं त्या करुन देत असत. महाविद्यालयात असताना त्यांचा संपर्क बीना दास यांच्याशी आला. प्रितीलता वड्डेदार यांच्याशी त्यांची भेट झाली.

प्रतिलता यांनी कल्पना दत्त यांची भेट ‘मास्टर दा’ म्हणजे सुर्य सेन नावच्या महान बंगाली क्रांतीकाऱ्याशी भेट झाली. यानंतर त्यांनी ‘इंडीयन रिपब्लिकन आर्मी’ या क्रांतीकारी संघटनेत सहभाग नोंदवला. कल्पना सहकाऱ्यांसोबत मिळून लपून छपून साथिदारांना हत्त्यारं पोहचवायची. यासोबतच क्रांतीकाऱ्यांसोबत बॉम्बसुद्धा कल्पना दत्त बनवायच्या.

चितगाव विद्रोहानंतर कल्पना आणि तिचे इतर साथीदार पोलिसांच्या नजरेत आले. प्रतिकुल परिस्थीतीचा अंदाज आल्यानंतर त्या गावी परतल्या. तिथूनच त्या सुर्यसेन आणि त्यांच्या साथिदारांना मदत पुरवू लागल्या. त्यांना बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

कल्पना आणि प्रितिलता यांच्यावर कलकत्त्याच्या युरोपियन क्लबवर बॉम्ब फेकण्याची जबाबदारी देण्यात आली. योजनेला मुर्त रुप देण्यासाठी त्यांनी पुरुषाचं वेशांतर केलं. ब्रिटीशांना या कटाची किणकिण जाणवली. त्यांचा शोध सुरु झाला. एका आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांच्यावर केस टाकण्यात आली; पण पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. त्यांच्या घरावर पोलिसांचा पहारा होता. हा पहारा तोडून मोठ्या चालाकीन त्या बाहेर पडून सुर्य सेन यांच्या मदतीसाठी निघाल्या.दोन वर्ष भूमिगत राहून त्यांनी क्रांतीकारी काम केलं. ब्रिटीश त्यांच्या शोधात होते. १९३३ साली सुर्यसेन यांना अटक झाली.

यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भरपूर पुरावेही मिळाले होते. त्यांना अजिवन कारावासाची शिक्षा झाली. वयाच्या २१ व्या वर्षी कल्पना दत्त यांना अजिवन कारावासाची शिक्षा झाली. तुरुगांमध्ये कैद झाल्यानंतर त्यांच्या क्रांतीकारी स्वप्नांचा चुराडा झाल्याचं त्यांना जाणवत होतं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना पुढं लढता येणार नाही हे स्पष्ट होतं. नंतरच्या काळात गांधींनी इंग्रजांनी कैद केलेल्या कैद्यांना सोडवण्याच मोहीम हातात घेतली. यात कल्पना यांच ही नाव होतं. महात्मा गांधी कल्पना दत्त यांना भेटायला स्वतः जेलमध्ये गेले होते. १९३९ साली त्यांची सुटका झाली.

पदवीचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी १९४३ साली पुरनचंद जोशी यांच्याशी विवाह केला. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी दुष्काळग्रस्तांची मदत केली. दिवस रात्र त्या काम करत राहिल्या. स्वातंत्र्यांनंतरही विधायक कामं त्या करत राहिल्या. बंगालहून त्या दिल्लीला गेल्या. इंडो-सोव्हिएत सोसायटीच्या त्या सदस्या बनल्या. १९७९ मध्ये कल्पना यांना मरणोत्तर ‘वीर महिला’ पदवीनं सन्मानित करण्यात आलं.

कल्पना यांनी ८ फेब्रुवारी १९९५ साली शेवटचा श्वास घेतला. स्वातंत्र्यानंतरही त्या अलिप्त राहिल्या. या क्रांतीकारी महिलेची गोष्ट त्यांची सुन मानिनि यांनी शब्दबद्ध केलं. ‘डु एंड टाई- चितगाव विद्रोह’ असं त्यांच्या पुस्तकाच नाव आहे. कल्पना यांनी हिंमत आणि शौर्याचं नवं उदाहरण भारतीयांसमोर ठेवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button