का झाला म्यानमारमध्ये सैन्याचा उठाव? काय आहे सत्तापालट होण्यामागे कारण?

Min Aung Hlaing

म्यानमारमध्ये (Myanmar) एका रात्रीत सत्ता पालट झालाय. तिथल्या सैन्याच्या सर्वोच्च कमांडरनं सत्तेची सुत्र हाती घेत एका वर्षाची आणीबाणी म्यानमारात लागू केलीये. म्यानमारच्या नेत्या आँग सान सु ची (Aung San Suu Kyi) यांना ताब्यात घेवून नॅशनल लिग फॉर डेमोक्रसीचा सदस्यांना तुरुंगात पाठवलंय. तसेच म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट यांनाही कैद करण्यात आलंय. आता सत्तेची सारी सुत्र कमांडर इन चीफ आंग ह्लाइंग (Min Aung Hlaing) यांच्याकडे असतील अशी माहिती म्यानमारच्या सैन्य टिव्हीने दिलीये.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणूका झाल्या. या निवडणूकीत आँग सान सु ची यांच्या पक्षाला मोठं बहूमत मिळालं. मात्र सैन्यदलानं या निवडणूकीत घोटाळा झाल्याचे आरोप केले. यानंतर लष्कर आणि सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात तणावाच वातावरण होतं त्याचीच परिणीती म्हणून आजच्या सत्तांतराकडे पाहता येईल.

म्यानमार लष्कराचे म्हणने आहे की “सार्वत्रिक निवडणूकांमध्ये गडबड झाल्याचं त्यांच म्हणनं आहे. देशात मोठ्याप्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या नेत्या आँग सान सू ची यांनी सैन्याची दडपशाही सहन करु नका, विरोध करायला रस्त्यावर उतरा असं आवाहन केलंय. त्यामुळं म्यानमारमधील मुख्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्याची तैनाती करण्यात आलीये.

लष्कराची दिर्घकाळ होती सत्ता

म्यानामारमध्ये लष्कराची दिर्घकाळ सत्ता राहिलीये. १९६२पासून ते २०११पर्यंत म्यानमारमध्ये लष्कराचा एकछत्री अंमल होता. सैन्यदलाची या देशात हुकुमशाही होती. २०१०ला म्यानमारमध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूका झाल्या आणि म्यानमारात पहिले नागरिकांचे सरकार बनले. जनतेकडून निवडलेल्या प्रतिनिधींना राजकारभार चालवायची संधी मिळाली.

म्यानमारमध्ये २०११पर्यंत लष्कराची सत्ता होती. आँग सान सू ची यांनी लष्कराची सत्ता उलथून लावत तिथं लोकशाही आणली.

म्यानमारमध्ये इंटनेट सेवा खंडीत

लष्काराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर इंटरनेट बंद करण्याच काम तातडीनं केलं. याआधी म्यानमार सरकारनंही इंटरनेट सेवा खंडीत केली होती. म्यानमारच्या काही भागात स्थानिक लोकांचा लष्काराशी संघर्ष सुरु होता तिथंली इंटनेटसेवा बंद करण्यात आली होती. सोमवारी पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी आठपर्यंत इंटरनेट सेवा बंद होती. त्याचा फटका म्यानमा पोस्ट अँड टेलिकॉम्युनिकेशन्स (एमपीटी)सारख्या सरकारी मालकीच्या आणि टेलिनॉरसारख्या खासगी कंपन्यांनाही बसलाय. यामुळं संपूर्ण म्यानमार देशातली ७५ टक्के इंटनरेट सेवा बंद होती.

म्यानमारमधली जनता दहशतीत

म्यानमारमध्ये लष्करानं हातात सत्ता घेतल्यापासून नागिरकांसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात. यामुळं म्यानमारच मोठं आर्थिक नुकसान होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जाताहेत. १९८८ला लष्कराशी रक्तरंजीत संघर्ष करुन सैन्यानं म्यानमारची सत्ता ताब्यात घेतली होती. यावेळी सू ची यांनी मानवी हक्कांविरोधी धोरणांचा विरोध केला होता. १९९०ला त्यांचा झालेला विजय लष्कराने अमान्य केला होता. सैन्यान सत्ता स्वतः जवळ ठेवली या काळात कुपोषण, चलनवाढ, भ्रष्टाचार अशा समस्यांशी सामान्य म्यानमारच्या नागरिकांना लढा द्यावा लागला होता. पुन्हा अशी परिस्थीती निर्माण होईल की काय? अशी नागरिकांना भीती आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेत पडसाद

म्यानमारमधील सत्तांतरावर आंतराष्ट्रीय स्तरावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटताहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलियांसह अन्य देशांनीा यावर चिंता व्यक्त केलीये. म्यानमारच्य सैन्याने कायद्याचा आदर करावा असे त्यांनी अवाहन केलंय. “म्यानमार सैन्यानं स्टेट काउंसलर आँग सान सु की आणि इतर अधिकाऱ्यांना अटक करुन देशातील देशातील लोकशाहीला धोका पोहचवलाय.” असे विधान व्हाइड हाऊसचे प्रवक्त जेन साकी यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER