वीज पुरवठा खंडीत का झाला? भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी – मुख्यमंत्री

Nitin Raut - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुंबई (Mumbai) महानगरातील वीजपुरवठा (Power Cut) अचानक खंडीत झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. दादर, लालबाग, परळ, अंधेरी, वांद्रे यासह अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडी झाला. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. जवळपास अडीच तासानंतर मुंबईतील वीज पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत, तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनाही सूचना दिल्या होत्या.

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे. तसेच तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिलेत.

तसेच याप्रकरणी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER