महाराष्ट्राचा छळ का? जितेंद्र आव्हाडांचा रेमडेसिवीरवरून केंद्राला संतप्त सवाल

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना खायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेडची व्यवस्था आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप (Jitendra Awhad’s angry question to the Center govt) होत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच राज्यांना रेमडिसिवीर इंजेक्शन (Remedesivir Injection) वितरित करण्याची घोषणा केली आहे.

यामध्ये महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिवीर देणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) आणि नवाब मलिक(Nawab Malik) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt)निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रामधील रेमडेसिवीरची मागणी ५० हजारांची आहे, राज्य सरकार ३३ ते ३६ हजार पुरवत आहे. मात्र, आता केंद्राने ताब्यात घेतल्यामुळे  महाराष्ट्राला २६ हजार मिळणार आहे.

महाराष्ट्राचा छळ कशासाठी?” असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून व्यक्त केला आहे. महाराष्ट्राला दिवसाला ५० हजार इंजेक्शन लागतात, राज्य सरकारने तशी मागणीही केली आहे; पण केंद्र सरकारने आता २६ हजार इंजेक्शन दिले आहेत. राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर दिले जावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राला रोज ५० हजार रेमडेसिविर द्या, अन्यथा मोठे संकट उभे होईल; मलिकांची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button