ऑक्सिजन एक्सप्रेस का रखडली? दिरंगाईची चौकशी करा; शिवसेना खासदाराचे पंतप्रधानांना पत्र

Arvind Sawant - PM Modi - Maharastra Today
Arvind Sawant - PM Modi - Maharastra Today

मुंबई :- कोरोना संकटात ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. देशासह अनेक राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ऑक्सिजन एक्सप्रेसवरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसला पोहचण्यास दिरंगाई होत आहे, याची उच्चस्तरीय चौकशी करावी.

ही बातमी पण वाचा : ऑक्सिजन टँकर अडवल्यास केंद्रात कोणाशी संपर्क साधायचा?; केजरीवाल यांचा पंतप्रधानांना सवाल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगभरात हाहाकार घातला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झापाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णवाढीमुळे ऑक्सिजन,व्हेंटिलेटर आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. दुसऱ्या राज्यातून आणण्यात येणारा ऑक्सिजन पोहचण्यासाठी दिरंगाई होत आहे. विशाखापट्टणमवरून ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात (Maharashtra) येण्यासाठी उशीर का झाला? या एक्सप्रेसला बरेच ठिकाणी अडवण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजन एक्सप्रेससंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (Shivsena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, “कोरोनामुळे देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. देशात ४० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा लवकर व्हायला हवा होता. दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी झाकीर हुसेन रुग्णालयात २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.”

ऑक्सिजन एक्सप्रेसला थांबविण्यात आल्यामुळे विशाखापट्टणमला ट्रेन उशिरा पोहचली. यामुळे आता मुंबईला २५ तारखेला ऑक्सिजन मिळेल. यामुळे ऑक्सिजन एक्सप्रेसला पोहचण्यास विलंब झाल्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना जबाबदार धरण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button