फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का ? भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत . ठाकरे सरकार फक्त हिंदू सणांनाच आडकाठी का करते, असा सवाल भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होळीचा सण (Holi 2021) साजरा करण्यात काय गैर आहे? इतर धर्माच्या लोकांच्या सणांना परवानगी दिली जाते. ते लोक कोरोनाचे नातेवाईक आहेत का, याचे उत्तर वसुली सरकारने द्यावे, अशी टीका राम कदम यांनी केली.

राम कदम यांनी रविवारी ट्विट करत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button