…. ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? – भातखळकर यांचा प्रश्न

Atul Bhatkhalkar - Anil Parab - Uddhav Thackeray

मुंबई :- दिवाळीचा (Diwali) सण तोंडावर असताना पगार थकल्याने जळगाव जिल्ह्यात मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबरला) गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप ‘सुसाईड नोट’मध्ये केला. यावरून भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) प्रश्न विचारला – ”ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांना का अटक करत नाही?”

”अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते. तर एस टी चे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी बेशरम ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही जबाबदार धरावे. असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : पगार नाही : दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकारला धरले जबाबदार

तसेच, दिवाळी उत्सवात महापालिका आणि पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी पाहता ‘हिंदूना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे’ असे ‘सेक्युलर’ धोरण ठाकरे सरकारने अंगिकारलेले दिसत आहे. अशी देखील टीका भातखळकर यांनी दुसऱ्यात ट्विटमधून ठाकरे सरकारवर केली.

करोना (Corona) महामारीमुळे ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे एसटी कर्चचाऱ्यांचे वेतन रखडलं आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्व एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे जळगाव शहरात आणि एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER