निकोलस पुरनच्या चष्म्याची चर्चा का आहे?

Nicholas Pooran

टी-20 सामना (T20 cricket) आणि फलंदाजाला चष्मा, म्हणजे एकाच सामन्यात दोन वेळा शून्यावर (Zero) बाद! पण हे कसं शक्य आहे? हे शक्य नाही असे वाटणे साहजिक आहे पण रविवारी पंजाबचा (Punjab) निकोलस पुरनने (Nicholas Pooran) ज्या प्रकारे टी-20 सामन्यात चष्मा मिळवला त्यावरुन हे शक्य असल्याचे दिसून आले.

निकोलस पुरनच्याच चष्म्याची चर्चा सध्या सुरु आहे. आयपीएलच्या एकाच सामन्यात दोन वेळा शून्यावर बाद झालेला तो पहिला फलंदाज ठरला. नियोजीत डावात त्याला रविचंद्रन अश्विनने तिसºयाच चेंडूवर त्रिफळाबाद केले. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही तिसºयाच चेंडूवर तो पुन्हा त्रिफळाबाद झाला. यावेळी गोलंदाज कासीगो रबाडा होता.

आहे आॅस्ट्रेलियन अष्टपैलू मोझेस हेन्रीक्स. २०१३ मध्ये बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्ससाठी खेळताना पर्थ स्कॉर्चर्सविरुद्ध त्याला हा चष्मा मिळाला होता. त्यावेळी नियोजीत डावात तो र्चौथ्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर यासीर अराफतने त्याची दांडी उडवली होती.

चष्माधारी दुसरा फलंदाज आहे पाकिस्तानच शोएब मलिक. पहिल्या रमादान कप टी २० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान एअरलाइन्ससाठी खेळताना तो दोनदा भोपळ्यावर बाद झाला. नियमीत डावात तो पहिल्याच चेंडूवर परतला आणि सुपर ओव्हरमध्येही त्याला भोपळा फोडण्यात अपयश आले होते. त्यानंतर आता निकोलस पुरनने हा चष्मा मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER