कडक निर्बंध सर्वसामान्यांसाठीच का?; आव्हाड, सुळेंवर भाजपचा निशाणा

Supriya Sule - BJP - Jitendra Awhad

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाने (Corona) डोके वर काढले आहे. राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दरम्यान सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे नेते हलगर्जीपणा करत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. हा आरोप करताना भाजपाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे.

राज्यात कोरोना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलली जातील, असे ठाकरे सरकार (Thackeray Government) म्हणत आहे. मात्र याच सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे कार्यकर्ता मेळावे घेत आहेत, असे भाजपाने (BJP) ट्विटमध्ये म्हटले. मंत्री आणि खासदार असे मेळावे घेत असतील, तर मग कडक निर्बंध फक्त सर्वसामान्यांसाठीच का? भाजपाने ट्विटसोबत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमाचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्यात हा खोटेपणा कशासाठी? असासुद्धा सवाल भाजपाने केला आहे. ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलणार, काय सूचना देणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER