मी कशाला नाराज होऊ ; काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे – अजित पवार

Ajit Pawar-Nana Patole

मुंबई:   कॉंग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole)यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नाराज असल्याच्या चर्चा आहेत. विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मी कशाला नाराज होणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच हे आधी ठरलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला ठरलं होतं. चर्चा करतात, नाना पटोलेंनी सर्वांशी चर्चा केली. आघाडी सरकारमध्ये चर्चेने मार्ग काढले जातात”, असं ते यावेळी म्हणाले.

तसेच, “काँग्रेसला पदं मिळाली आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, अधिवेशन संपल्यावर नाना पटोलेंनी राजीनामा दिला असता तर अधिक बरं झालं असतं. पण त्यांच्या हायकमांडने निर्णय दिला”, असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER