शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? – किरीट सोमय्या

श्रीमती अनंत करमुसे यांना पोलिस स्टेशन येथे आरोपी म्हणून बोलावलं आहे.

Sharad Pawar-CM Thackeray-Kirit Somaiya

मुंबई: महाविकास आघाडीचे सामाजिक न्याय मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर अनंत करमुसे या तरूणाला मारहाम करण्यात आली होती. हे प्रकरण करमुसे यांच्या परिवारासाठी पहिले शारीरीक तर आता मानसिक त्रास देणारे ठरत आहे. याविषयी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे.

ठाणे पोलिसांनी श्रीमती अनंत करमुसे यांना पोलिस स्टेशन येथे आरोपी म्हणून बोलावलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोणतीही कारवाई नाही पण करमुसे कुटुंबीयांवर पोलिसांच्या माध्यमातून दबाव? आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आणि मुख्यमंत्री गप्प का, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोरोनाच्या युद्धात राज्य सरकार लढा देत असतानाच राजकीय लढाही जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. अनंत करमुसे, वाधवान कुटुंबाची महाबळेश्वर सहल या प्रकरणांनी राज्यातील राजकारण तापण्यास जोरदार हवा मिळत आहे.

वाधवान प्रकरणात करमुसे प्रकरण थांबेल असे दिसत असतानाच किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तिकडे विरोधक दोन पाटलांमध्येही वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. एकूणच कोरोनाच्या युद्धात राजकीय लढाईही तेवढ्याच ताकदीने सुरू असल्याचे राज्याचे चित्र आहे.

वाधवान प्रकरण, करमुसे प्रकरणावरून भाजपाने ठाकरे सरकारपूढे नवे आव्हान ऊभे केले आहे.

‘उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत’, मात्र गुप्ता प्रकरणावर तुमचा कणखरपणा दिसला नाही – राजू शेट्टी