राजू शेट्टींची ऊस परिषद आणि आंदोलन आता कशासाठी : मुश्रीफ

hassan Musrif & Raju Sheety

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे कृषीमंत्री असताना एफआरपी कायदा आणला यावर दर निश्चीत होतात. कोल्हापूर जिल्हयामध्ये एकरक्कमी एफआरपी दिली जात असताना अन्य जिल्हयामध्ये त्याचे तुकडे केले जातात. त्यामुळे ऊस परिषद व ऊसाचे आंदोलन कशासाठी हे कोडेच असल्याची प्रतिपादन ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले. ते गडहिंग्लज येथील आज (ता.३१) गोडसाखरच्या ४२ व्या गळीत हंगामावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्हयातील कारखानदार कर्जबाजारी झाला असून आगामी काळात कारखाने टिकणे अडचणीचे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगताना राजू शेटटी यांनी आता आंदोलनाची दिशा बदलण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्हयातील कारखाने एकावेळी एफआरपी देतात शेजारील सांगली व सातारा येथील कारखाने तीन टप्प्यात तर उर्वरीत ठिकाणी रखडलेले देखील असते. एकरक्कमी एफआरपी देवूनही कोल्हापूर जिल्हयातच ऊस आंदोलन होत असून आंदोलन कशासाठी हाच प्रश्न तयार झाला आहे. याचा परिणाम कारखानदारीवर झाल्याने आता राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

यावेळी मुश्रीफांनी केंद्रसरकारच्या धोरणावरही टिका केली. साखरेचे दर ३१०० वरून ३३०० करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करत आहे. बिहार व मध्यप्रदेशच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून हे सुरू असले तरी यामुळे महाराष्ट्रातील कारखानदार घाईला आले आहेत. बफर स्टॉकचाही निर्णय अधिकच धोकादायक बनला असून त्यांचे अनुदान व गोडावूनमध्ये पडलेली साखर यातून कारखानेच कर्जबाजारी होत चालले आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहा व मोदींची भेट घेवून यापूर्वी एकदा प्रयत्न केला असून त्यांनी पुन्हा याकरीता प्रयत्न करावेत अशीही मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER