पोलीस भरती आताच का ? आता भरतीचा निर्णय योग्य नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षणाला (Maratha reservation) अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापू लागलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या मुद्द्यावर ‘TV9 Marathi ’ला दिलेल्या मुलाखतीत बिनधास्त उत्तरे दिली.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही आवडलेला नाही. पण न्यायालयानं त्यांचा निर्णय दिला आहे. या निर्णयावर आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काही लोक राजकीय हेतूनं कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा त्याच्याशी संबंध नाही. काही लोकांना असं वाटतंय की माझी जात ब्राह्मण आहे. त्यामुळं मला टीकेचा धनी करा. मात्र मराठा समाजाला सर्व माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले, असं फडणवीस म्हणाले.

पोलीस भरतीवर फडणवीस म्हणाले, “भरती करावी, मात्र आता घाई नाही. आपण ही स्थगिती हटवू शकतो का यावर विचार केला जावा. एक महिना उशीर झाल्याने कुठलाही फरक पडणार नाही. याबाबत चर्चा तरी करावी. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता भरतीचा निर्णय योग्य नाही”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER