लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता? प्रवीण दरेकरांचा महापालिकेला सवाल

pravin darekar - BMC - Maharshtra Today

मुंबई : मुंबई महापालिकेकडे लशींचा पुरेसा साठा नाही. तसेच सरकारी केंद्रांवरही लसीकरण होणार नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. पालिकेकडे लशींचा तुटवडा असल्याने आज जवळपास सर्वच लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा लसीकरण मोहिम खोळंबली आहे. यावरून भाजपचे (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पालिकेवर निशाणा साधला आहे.

“मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र थाटात उघडतात, पण लस नाहीत. लसीकरणाचा पुरता बोजवारा उडाला असून नियोजनाचा अभाव जाणवतो. महापालिका लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता? लोकांचा व यंत्रणांचा वेळ फुकट का घालवता? असा सवाल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

“स्वतःचे कौतुक करून घेत असताना लसीकरणाचे ढिसाळ नियोजन व मुंबईकरांना होत असलेल्या गैरसीयोची जबाबदारी पण मुंबई पालिकेने घ्यावी.” असा सल्ला दरेकरांनी दिला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button