रणबीर कशाला आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्स टेस्ट करा, निलेश राणेंची मागणी

Nilesh Rane - Aaditya Thackeray

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर सुरु असणाऱ्या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही उघड झालं आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी कंगना रणौत (Kangana Ranaut) बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गजांची नावं घेऊन सतत आरोप-प्रत्यारोप करत आहे. एवढचं नाहीतर गेल्या काही दिवसांपासून कंगनाने ट्वीट करत नावानिशी आरोपांचं सत्र सुरु ठेवलं आहे. यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असं म्हटलं होतं.

आता यावरुन माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेयांना (Aaditya Thackeray) लक्ष्य केलं आहे. केवळ रणवीर अथवा रणबीर कशाला तर आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची चाचणी करावी, कारण बॉलिवूडच्या सर्कलमध्ये आदित्य ठाकरेंचा वावर असतो असं निलेश राणे म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER