मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा का नाही; ‘पीएम टू डीएम मायनस सीएम’वर ममतादीदींचा आक्षेप

Maharashtra Today

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) २० मे रोजी कोरोना पार्श्वभूमीवर दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हर्चुअल चर्चा करणार आहेत. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वगळून पंतप्रधान फक्त जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक (Online Meeting)घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवली आहे. यामध्ये २० मे रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाइन बैठक होणार आहे.

कोरोना स्थितीबाबत बोलावलेल्या बैठकीवरून विरोध होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या ५४ जिल्हाधिकार्‍यांसोबत कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वगळून फक्त जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

बॅनर्जींचा आक्षेप

यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची शक्यता आहे. तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या मुद्द्यावर एकत्रित करतील. कारण या बैठकीसाठी ‘पीएम टू डीएम मायनस सीएम’ या पद्धतीचा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक का घेतली जात नाही, यावर प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button