सचिनने कधी नाही ते शेतकरी आंदोलनावर ट्विट करून चूक केली? शरद पवारांसह अनेकजण व्यक्त केली नाराजी

Sachin Tendulkar-Sharad Pawar

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar) शेतकरी आंदोलनावरून ( farmers protest) ट्विट केल्यानंतर त्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे . भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे’, असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले .

सचिनच्या या ट्विटरवरून शरद पवारही (Sharad pawar) नाराज झाले होते. सचिनवर सर्वस्तरातून टीका होत असल्याने पवारांनी सचिनला सल्लाही दिला. सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे, असं पवार म्हणाले होते.

राज ठाकरे यांनीही या वादातून उडी घेऊन भारतरत्नांना काही सवाल केले आहे. रिहाना कोण आहे? कुठून आलीय? भारतरत्न त्यांना का उत्तरे देत आहेत? यापूर्वी रिहानाला कोणीच ओळखत नव्हतं. आता सर्वच ओळखत आहेत. या रिहानाबाईला एवढं महत्त्व देण्याची गरज नव्हती, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER