राज्यपालांना विमानातून का उतरावे लागले?

मुंबई:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) आणि महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) सरकारमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून वाद होत असतात. आज राज्यपाल हे उत्तराखंड जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले. विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्यामुळे राज्यपालांना खाली उतरवले. त्यामुळे भाजपा आणि मविआ नेत्यांमध्ये टीका टिप्पणी सुरू झाली. पण मंत्रालयात संबंधित विभागाच्या विसंवादामुळे हे नाट्य समोर आले.

बुधवारी राज्यपालांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तराखंड जाण्यास परवानगी मिळाली नाही. त्यानंतर आज राजभवनाकडून यासंदर्भात चौकशी करूनच राज्यपालांनी विमानतळाकडे जाणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच. शासनाच्या विमानात राज्यपाल बसले. पण, विमानाला उड्डाण करण्यास मंत्रालयाकडून परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यपाल विमानातून खाली उतरले आणि प्रवासी विमानाने नियोजित दौऱ्यासाठी उत्तराखंडला रवाना झाले.

शासनाच्या विभागाकडे राज्यपालांसाठी विमान प्रवासासाठी परवानगीची मागणी झाली होती. रीतसर परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र पाठवले, पण परवानगी मिळाली नाही. याबाबतची माहिती वरिष्ठ आयएएस अधिकारी यांनी दिली. राजभवन कार्यालयालाही याबाबत माहिती असणे अपेक्षित आहे. पण याबद्दलसुद्धा विचारपुस करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER