फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गवर विश्वास का ठेवला जात नाही?

Maharashtra Today

एखादी चुक कंपनीची संपूर्ण प्रतिष्ठता धुळीस मिळवू शकते. सोशल मिडीया नेटवर्किंग साइट (Social Media Networking Site) म्हणून फेसबुक अल्पावधीतच लोकप्रिय झालं. जगातल्या बहूतांश लोकांकडे फेसबूक आहे आणि त्यांची सर्व माहिती फेसबुककडे. फेसबुकनं गेल्या काही वर्षात अनेक चुका केल्यात. त्यांची वारंवारत मात्र कमी होताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी #ResignModi, मोदी राजीनामाद्या अशा आशयाचा हॅशटॅग असणारी पोस्ट फेसबुककडून ब्लॉक करण्यात आली होती. मोंदीच्या सांगण्यावरुन फेसबूकनं हे केलं असल्याचं बोललं गेलं. नंतर याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर चुकून पोस्ट ब्लॉक झाली असल्याचं सांगत ती पोस्ट पुन्हा प्रदर्शित करण्यात आली.

फेसबुकच्या गलथान कारभारामुळं झालेल्या विवादांची अनेक उदाहरणं आहेत. २०१८मध्ये लोकप्रिय डिजीटल रिसर्चर आणि विश्लेषक ‘रेमंड सेरॅटो’ यांनी म्यानमारची कट्टर पंथी संघटना ‘मा- बा- था’ च्या १५ हजार फेसबुक पोस्टचं विश्लेषण केलं होतं. यातून त्यांनी निष्कर्ष काढला होता की बांग्लादेशमध्ये शरणार्थ्यांच जीवन जगणाऱ्या रोहिंग्या मुस्लीमांवर ही वेळ येण्यात फेसबूकचा मोठा हात आहे. कारण फेसबुकवरुनच रोहिंग्या मुस्लीमांविरुद्ध द्वेषपुर्ण पोस्ट पसरवण्यात आल्या. यामुळं रोहिंग्याविरुद्धच्या हिंसाचाराला बळ मिळालं. त्यांना म्यानमार सोडणं भाग पडलं. यात फेसबूकची भूमिका महत्त्वपुर्ण होती.

याआधी कॅम्ब्रिज अॅनेलिटीका प्रकरण ही घडलं होतं. २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत फेसबुकनं करोडो लोकांचा पर्सनल डेटा कॅम्ब्रिज अॅनेलिटीकाला अवैध पद्धतीने पुरवला होता. कॅम्ब्रिज अॅनेलिटीकाने या लोकांचे मतपरिवर्तन करुन डोनाल्ड ट्रम्प यांना मदत व्हावी यासाठी लोकांचा वापर केल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यामुळं फेसबुकच्या विश्वासहर्तेला तडा गेला होता. यामुळं फेसबुकचे सहसंस्थापक ‘मार्क झुकरबर्ग'(Mark Zuckerberg) यांना वापरकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागलं. याप्रकरणात सहभाग नसल्याचं सिद्ध कऱण्यासाठी अनेकांच्या हातापाया पडायची वेळ त्यांच्यावर आली होती. नंतर आरोपांची तीव्रता वाढल्यानंतर त्यांनी काही आरोप स्वीकारत त्यावर कबुली दिली होती. “फेसबुक युजर्सचा डेटा आम्ही तिसऱ्या कंपनीला देतो याचा अर्थ असा नाही की त्याचा गैरवापर होतो. फेसबूक माझ्याशिवाय कुणी दुसरा व्यक्ती माझ्याशिवाय चालवू शकत नाही. मला आणखी एकस संधी मिळायला हवी. ही मोठी चुक आहे मला मान्य आहे. मला एक संधी अजून मिळायला हवी, लोक चुकांमधूनच शिकत असतात.”

झुकरबर्ग विश्वासाच्या पात्र आहेत का?

फेसबुक डेटा लिक झाल्यानंतर ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने सर्व्हे केला होता. यानूसार जगभरात फक्त ४१ टक्के लोक फेसबुकवर विश्वास ठेऊ शकतात. लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती इतरांच्या हातात जाण्याची भिती आहे. यामुळं अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी अकाउंट डिलीट केले होते. यामुळं फेसबुक कंपनी आणि झुकरबर्ग यांना मोठ्या नुकसानाला तोंड द्यावं लागलं. तसेच फेसबूकच्या ज्या शोधाबद्दल जगानं झुकरबर्ग यांना डोक्यावर घेतलंय ती खरी त्याची कल्पना नाहीये.

मुळ विचारासह फेसबुकची सुरुवात केली होती टायलर विंकल्वॉस, कॅमरन विंकल्वॉस आणि दिव्य नरेंद्र नावच्या तीन युवकांची. हॉवर्ड विद्यापीठात ते झुकरबर्ग यांचे सिनिअर होते. त्यांनीच ‘हॉरवर्ड कनेक्शन’ यानावानं वेबसाइट सुरु केली होती. नंतर डिसेंबर २००२म ध्ये याच नाव बदलून ‘कनेक्ट यू’ असं ठेवण्यात आलं. तिघांनी ही वेबसाइट २१ मे २००४ मध्ये लॉंच केली होती. या वेबसाइटसाठी झुकरबर्ग यांनी सोबत काम करावं अशी तिघांची इच्छा होती. झुकरबर्ग यांना तोंडी करारावर या वेबसाइटमध्ये भागीदार बनवण्यात आलं. झुकरबर्ग यांना या वेबसाइटसाठी कोडींग संबंधित काम करायचं होतं. यासाठी झुकरबर्ग यांना सर्वर लोकेशन आणि पासवर्ड देण्यात आले.

यानंतर अनेक दिवस झुकरबर्ग वेगवेगळी कारण देत तिघांना भेटणं टाळत होते. अनेक मिटींग त्यांना टाळल्या. १७ डिसेंबर २००३ ला चौघे एकत्र आले. १३ जानेवारीला ते पुन्हा वेबसाइटबद्दल बोलण्यासाठी एकत्र आले. याआधी झुकरबर्गनी ‘द फेसबूक डॉट कॉम’ डोमेन विकत घेतला होता. यानंतर वादाला सुरुवात झाली. २००८ ला याप्रकरणी कोर्टात सुनवायी झाली. कोर्टानं फेसबूकला साडे सहा करोड डॉलर्सचा दंड विंकल्वॉस बंधू आणि नरेंद्र यांना देण्यास सांगितलं. ज्या वेबसाइटमध्ये झुकरबर्ग यांना काम करायचं होतं ती आयडीया झुकरबर्ग यांनी चोरली. झुकरबर्ग यांची सुरुवातच वादाच्या भोवऱ्यातून बाहेर पडत झाल्यानं ते वारंवार वादात अडकतात असं बोललं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button