अल – अक्सा मशिदीसाठी इस्राएल आणि पॅलेस्टाईनमध्ये का सुरू आहे वाद ?

Jerusalem - Western Wall - Al Aqsa Mosque

इस्राएलची राजधानी जेरुसलम येथे अल – अक्सा मशिदीवरून (Al-Aqsa Mosque) पुन्हा भयंकर तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पॅलेस्टाईनचे निदर्शक आणि इस्राएलच्या सुरक्षा दलांमध्येच चकमकी सुरू आहेत. कारण, जेरुसलम हे ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान (Jews, Christians and Muslims) या तीन धर्मांचे पवित्र शहर आहे.

जेरुसलमबाबत इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद अतिशय जुना आहे. जेरुसलम ही आमची राजधानी आहे, असा दोघांचाही दावा आहे. हे जगातील महत्त्वाचे प्रार्थना केंद्रही आहे.

हे प्राचीन शहर प्राचीन ज्यू राज्याची राजधानी होते. इथे ज्यूंचे पवित्र सोलोमन मंदिर होते. हे मंदिर रोमन आक्रमकांनी उद्ध्वस्त केले. याचा उल्लेख बायबलमध्ये ‘प्रथम मंदिर’ असा करण्यात आला आहे. हे मंदिर दहाव्या शतकात बांधण्यात आले आहे, असे सांगतात. या मंदिराचे अवशेष अजूनही तिथे आहेत.

या शहरातच येशूला सुळावर चढवण्यात आले आणि ते पुन्हा प्रकट झालेत, अशी मान्यता आहे. येशूची समाधी ‘द चर्च ऑफ द होली सेपल्कर’मध्ये आहे. जगातील लाखो ख्रिश्चन इथे दरवर्षी प्रार्थना करण्यासाठी येतात. याशिवाय – द इस्राएल म्युझियम, याद भसीम, नोबेल अभ्यारण, कुव्वत अल सकारा, मुसाला मरवान, सोलोमन टेंपल, वेस्टर्न वॉल, डेबिड्सचा घुमट ही या शहरातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत.

अल- अक्सा मशीदही याच शहरात आहे. मुसलमान धर्माची उत्पत्ती याच मशिदीतून झाली, अशी मान्यता आहे. इथेच महंमद पैगंबर यांचे निर्वाण झाले. कुराण शरीफमध्येही या मशिदीचा उल्लेख आहे. इथे हजारो मुसलमान नमाजासाठी रोज येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button