जयगडच्या किल्ल्यातला खजिन्याचं सत्य आणीबाणीच्या भूकंपात दबून गेल्याच का बोललं जातं?

अकबराच्या (Akbar)नऊरत्नांची नावं तुम्हाला माहिती असतील तर राजा मानसिंग हे नाव तुमच्यापर्यंत पोहचलं असेल. बुद्धिमत्ता आणि सैन्यकुशलतेच्या जोरावर त्यांनी अकबराच्या मनात जागा मिळवली नव्हती. त्यांना प्रेमानं ‘राजा मिर्जा’ म्हणलं जाऊ शकतं. सेनापती मानसिंग यांनी अकबरासाठी अनेक लढाया लढल्या होत्या आणि जिंकल्याही होत्या. देशभरातल्या प्रत्येक राज्यावर मुघलांनी हल्ले केले. ती राज्य जिंकली आणि तिथले खजाने लुटले. यात मानसिंग यांचा पुढाकार होता. त्यांना या लुटीच्या संपत्तीत बरोबरीचा अधिकार होता. मानसिंग यांचे वडील भगवानदास(Bhagwandas) यांनी अकबरासाठी गुजरातची महत्त्वाची लढाई जिंकली होती.

१५४० साली मानसिंग(Mansingh) यांचा जन्म झाला. ते अम्बेर रियासतीचे राजा होते. मुघल बादशाहशी त्यांनी सलगी करुन भारतात दबदबा वाढवला. हल्दीघाटीच्या लढाईत अकबरानं महाराणा प्रतापांच्या सैन्याचा पराभव करण्यात मानसिंग यांचा सिंहाचा वाटा होता.या विजयानंतर महाराणाप्रताप यांचे राज्य लुटण्याचे आदेश मुघलांकडून मिळाले तेव्हा त्यांनी नकार दिला. मानसिंग यांची नियुक्ती १५९४ मध्ये बंगाल, उडीसा आणि बहारचा शासक म्हणून करण्यात आली होती. या वेळी त्यांनी अनेक बड्या रियासतींचा पराभव करत त्यांची संपत्ती स्वतःच्या नावे करुन घेतली. वर्षानुवर्षे पराक्रम गाजवत मोठी संपत्ती त्यांनी स्वतःच्या नावे केली. ही संपत्ती आमरे किल्ल्ल्यात एका गुप्त ठिकाणी दडवण्यात आली होती. भारतातली सर्वाधिक संपत्ती त्यांच्याकडे असल्याचं त्यावेळी बोललं जायचं.

एका कथेनूसार अकबराच्या आदेशावर मानसिंग अफगाणिस्तानातल्या काबूलला गेले. तिथल्या जनतेला लुटारुंपासून मोठा धोका होता. मानसिंग यांनी लढाईत या लुटारुंचा पराभव केला. मानसिंग यांनी युसुफजाईच्या छावणीतलल सरदारांची हत्या करत बिरबलाच्या हत्येचा बदला घेतला. लुटारुंकडे त्यावेळी हजारो टन सोनं होतं. हा खजिना मानसिंग यांनी स्वतः सोबत ला आणि मुघलांच्या हाती ही संपत्ती न देता आमेरच्या किल्ल्यात ही संपत्ती लपवली.

सरकारपर्यंत पोहचली खबर

यानंतर मानसिंग यांच्या खजिन्याची कुठच चर्चा झाली नाही. परंतू याचा उल्लेख अरबी भाषेतलं जुनं पुस्तक ‘हफ्त तिलिस्मत-ए – अंबेरी’ (अंबेरीचे सात खजिने) या पुस्तकात आढळतो. यात लिहलं होतं की संपूर्ण हिंदोस्तानाची संपत्ती एकीकडे आणि आफगाणिस्तानातून मानसिंगाने लुटलेली संपत्ती एकीकडे. या पुस्तकात सांगितलं होतं की जयगड किल्ल्याच्या खाली सात महाकाय पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. मानसिंग यांनी इथच तो खजिना लपवला आहे. या खजान्याची चर्चा पहिल्यांदा १९७६ मध्ये झाली. त्यावेळी जयगडच्या महाराणी होत्या ‘गायत्री देवी’ तर पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी(Indira Gadhi). दोघी सक्षम नेतृत्त्वाच्या धनी होत्या. इंदिरांचा विरोध करत त्यांनी सलग तिनदा लोकसभेत जागा मिळवली होती.

बऱ्याच मोठ्या कालावधीपासून दोघींमध्ये विरोध होता. १९७५ साली देशात आणीबाणी लागू झाली. केंद्राला मनमानी कारभार करण्याचे पुर्ण अधिकार मिळाले. केंद्राच्या आदेशाने गायत्रीदेवींना तुरुंगात डांबण्यात आलं. त्यांच्यावर विदेशी मुद्रा उल्लंघनाचा गंभीर आरोप करण्यात आला. या आरोपाचा आधार घेत पोलिसांनी जयगड किल्ल्यावर छापा मारला. यात सैन्यदलाचाही सहभाग होता. सलग तिन महिने जयपूर किल्ल्यात शोध सुरु होता. सरकारनं किल्ल्याचं मोठं नुकसान केलं. शोध संपल्यानंतर महालात खजिना नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं.

संशयाच्या कठड्यात सरकारनं

सरकारनं खजिना मिळाला असल्याची गोष्ट अमान्य केली असली तरी लोकांच्या पचनी ही गोष्ट पडली नाही. ज्यादिवशी खोदकाम बंद झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणतही कारण नसताना दिल्ली जयपूर हाय-वे बंद ठेवण्यात आला. हाय-वे बंद का ठेवला होता या प्रश्नाला परत कॉंग्रेसच्या कोणत्याच नेत्यानं उत्तर दिलं नाही. राजघराण्यातल्या सदस्यांना यावर विश्वास नव्हता. सांगितलं जातं की १९७७ साली जनता पार्टीचं सरकार बनल्यानंतर राजघराण्याला खजिन्यातील काही हिस्सा देण्यात आला होता. सत्य काय होतं हे आणीबाणीसह दाबलं गेलं. आजपर्यंत कोणालाच सत्य काय हे समजलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button