योगींच्या नव्या फिल्मसिटीमुळे ठाकरे सरकारच्या पोटात का दुखतंय? राम कदमांचा टोला

Ram Kadam - Uddhav Thackeray - Yogi Adityanath

मुंबई :- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशमध्ये नवी फिल्मसिटी तयार करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयाचे भारत देशाने स्वागत केले आहे मात्र, राज्य सरकारच्या पोटात का दुखत आहे?; तेच समजत नाही, असा टोला भाजप (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी राज्य सरकारला लगावला.

राम कदम म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये नवी फिल्मसिटी उभारत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले. मात्र, ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) पोटात का दुखत आहे. तेच कळत नाही, असं राम कदम म्हणाले. तसेच, यावेळी कोरोना काळात चित्रपटसृष्टीत झालेल्या नुकसानावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सर्व चित्रपट, मालिकांचे चित्रकरण तसेच प्रदर्शन बंद होते. त्यामुळे अनेक निर्मात्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यावर बोलताना कदम म्हणाले की, कोरोनाकाळात राज्यातील फिल्मसिटीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या क्षेत्राला राज्य सरकारने कुठलीही मदत केली नाही,” असे म्हणत कदम यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

ही बातमी पण वाचा : बॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का? शिवसेनेचा योगींना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER