राज्यात लसीकरण सुरु असतानासुद्धा का वाढतायेत करोनाग्रस्तांचे आकडे?

Maharashtra Today

महाराष्ट्रात कोरोना पुन्हा हातपाय पसरत असल्याचं चित्र निर्माण झालंय. गुरुवारी राज्यात २५,८३३ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानं भितीचं वातावरण निर्माण झालंय. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचं बोललं जातंय. गेल्या महिन्याभरापासून सरासरी १५ हजार नवे रुग्ण आढळतायेत.

एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण गुरुवारी आढळल्यानं चिंता व्यक्त केली जातीये. मागच्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ कोरोना रुग्ण आढळले होते. देशभरात आढळणाऱ्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण एका महाराष्ट्रातले आहेत.

भारतात कोरोनाची लस तयार होऊन तिच्या वाटपालाही सुरुवात झालीये. सामान्य नागरिकांना ही नोंदणीनंतर काही भागात लस उपलब्ध होत असतानासुद्धा भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. आता पर्यंत महाराष्ट्रात ३६ लाख ३९ हजार ९८९ जणांना कोरोनाच्या लसीचा डोस देण्यात आलाय. तरुण रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासह सामान्यांच्याही चिंतेचा विषय बनलीये.

केंद्र आणि राज्य पुन्हा एकमेकांसमोर

राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राला पत्र लिहीत वाढीव कोरोना लसी द्याव्यात, अशी मागणी केलीये. नियोजीत १ कोटी ७७ लाख प्राधान्य क्रमातील लोकांच्या लसीकरणासाठी केंद्राकडून २ कोटी २० लाख डोस मिळावेत, अशी मागणी टोपेंनी पत्राद्वारे केलीये. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे लसींच्या वाढीव डोसांबद्दल मागणी केली. यावर ट्वीट करत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकार यांनी बाजू मांडली.

ते म्हणाले, ” “महाराष्ट्राला केंद्र सरकारनं 12 मार्चपर्यंत 54 लाख लशी दिल्या होत्या. पण आत्तापर्यंत त्यातील फक्त 23 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. म्हणजे 56% लशींचा वापर अजूनही केला गेलेला नाही.”

लशीच्या वितरणावरुन पुन्हा राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. केंद्राकडे पाकिस्तानासह जगभरात वाटण्यासाठी लशींचे डोस आहेत पण देशातील नागरिकांसाठी नाही. अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आलिये. विरोधकांचे हे आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावलेत. भारतीय वाट्याची लस परदेशात पाठवली जात नसल्याचं ते म्हणालेत.

का आली कोरोनाची दुसरी लाट?

भारतात कोरोनाचे लसीकरण(Corona Vaccine) सुरु झाले आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. यामुळं सर्वांच्याच चिंतेत वाढ झालीये. या वर्षाच्या सुरुवातीला भारतात रोज ५ ते ७ हजारांच्या दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढायची. पण आता कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटी ९० लाखांच्या घरात गेलीये. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात संतगतीनं लसीकरण सुरुये. सिक्कीम, मिझोरोम, त्रिपुरासारख्या दुर्गम राज्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरुये. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सध्या २३व्या स्थानावर आहे.

ताज्या आकडेवारीवर लक्ष घातलं तर ध्यानात येईल की राज्यात १४ मार्चपर्यंत ३५,७२,२८९ लसी देण्यात आल्या. पैकी ७ टक्के लोकांचे दोन डोस पुर्ण झालेत. देशभरातील लसीकरणापैकी १२ टक्के लसीकरण महाराष्ट्रात (12% Vaccination in Maharashtra) करण्यात आलंय. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये देशभरात कोरोनाचं संसर्ग झपाट्यानं झाला त्यामुळं आकडेवारीत वाढ झाल्याचं तज्ञ सांगतायेत.

“कोरोनाला लगाम लावण्यासाठी जे काही शक्य प्रयत्न केले जाऊ शकतात ते आम्ही करतोय, आयसीएमआरच्या मार्कदर्शक तत्वांचे काटेकोटपणे पालन केलं जातंय. कोरोनाची वाढते आकडेवारी आश्चर्याच कारण बनलीये. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना देऊन केंद्रीय पथकाच्या मार्गदर्शनाप्रमाणं उपाय योजना सुरु आहेत.” असं उत्तर महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिलय.

दरम्यान कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील शहरांमध्ये निर्बंध वाढवण्यात आलेत. काही ठिकाणी अल्प प्रमाणात लॉकडाऊनही घोषित करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER