राज्यात कोरोना का वाढत आहे ; मनसेने सांगितले कारण!

Bala Nandgaonkar - uddhav thackrey

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची(Corona) संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच कोरोना का वाढत आहे असा संशयात्मक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यातच राज्यात कोरोनावाढण्यामागे मनसेने संशय निर्माण केला आहे.

राज्यात खरेच कोरोना वाढल्याची परिस्थिती आहे, की औषधनिर्मिती कंपन्यांसाठी काही विशेष बाब आहे, असा प्रश्न उपस्थित करीत मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgaonkar) यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर म्हणाले, ‘राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत अशी परिस्थिती आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर अचानक मुंबईसह महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. ही बाब महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि भाई जगताप यांना देखील सांगा, अशी माझी विनंती आहे. एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी कोरोना पसरत नाही का’, असा सवाल त्यांनी केला.

तसेच, सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना? कारण कोरोना काळात मोठ्या प्रमाणात औषधे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु या औषधांच्या साइड्स इफेक्ट्समुळे ही औषधे खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या हिताचा तर यामागे विचार नाही ना, असे म्हणत नांदगावकर यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER