दिशा रवीच्या अटकेने का भरलीये पर्यावरण प्रेमींच्या मनात धडकी?

Why is the arrest of Disha Ravi shocking in the minds of environmentalists

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं शनिवारी संध्याकाळी पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला (Disha Ravi) अटक केली. २१ वर्षीय दिशाला ‘टुलकिट प्रकरणात’ (toolkit case) अटक करण्यात आलीये. बंगळूरूच्या खासगी महाविद्यालयात बीबीएच शिक्षण घेणारी दिशा फ्रायडे फॉर फ्यूचरच्या संस्थापकीय सदस्यांपैकी एक आहे.

शेतकरी आंदोलनासंबंधीत विवादीत ‘टुलकिट’ शेअर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हेच टुलकीट ग्रेटा थनबर्गने शेअर केलं होतं.

टुलकिट वाद काय आहे?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट करून स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने समर्थन केलं होतं. या ट्विटमध्ये आंदोलन कसं करावं, याची माहिती देणारे टुलकिट शेअर करण्यात आले होते. शेतकरी आंदोलन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? याची माहिती त्यात होती. ट्विटमध्ये कोणते हॅशटॅग असावेत, काय केले पाहिजे, कसा बचाव करावा? याची सर्व माहिती या टुलकिटमध्ये होती. ग्रेटाने आधीचं टुलकिट डिलीट करून नंतर नवं टुलकिट शेअर केलं होतं.

टुलकिट काय आहे?

टुलकिट हे डिजीटल शस्त्रं आहे. याचा उपयोग आंदोलनाला सोशल मीडियाला हवा देण्यासाठी होतो. अमेरिकेतील ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलनात त्याचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. आंदोलन अधिक व्यापक व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून या टुलकिटचा वापर केला जातो. यात आंदोलनात सहभागी होण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलनाविरोधात अँक्शन घेतली तर काय करायचे? याची माहितीही त्यात देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकताना घ्यावयाची काळजी, आंदोलन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी काय करायचे? याचीही माहिती यात आहे.

बंगळूरूची २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीला अटक झाली. त्यामुळं पर्यावरण प्रेमींमध्ये अस्वस्थता निर्माण झालीये. दिशा रवी ‘फ्राइडे फॉर फ्यूचर’ नावच्या मोहिमेची संस्थापक आहे. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनं शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारं ट्विट केल्यानंतर दिशाला अटक करण्यात आलंय.

दिशाला कोर्टासमोर उभं करताना पोलिसांनी सांगितल, “दिशा रवी टुलकीट गुगल डॉक्यूमेंटची इडीटर आहे. या डॉक्यूमेंटला बनवण्यात आणि प्रसारित करण्यात तिची मुख्य भूमिका होती. या डॉक्यूमेंटमधून खलिस्तानची मागणी करणाऱ्या पोएटीक जस्टीस फाउंडेशनसोबत मिळून देशात वैमनस्याचं वातावरण निर्माम करण्याच काम दिशा रवीकडून करण्यात आलंय.ग्रेटा थनबर्गसोबतच दिशा रवीनं हे टुलकीट शेअर केलं होतं,

दिशा सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केलाय. हाती घेतल्या कामाला तडीस नेवूपर्यंत कटीबद्धतेने काम करणारी दिशा रवी होती. देशद्रोही कायद्यांतर्गत नये म्हणून जून २०२०ला ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ ही महीम तिला बंद करावी लागली होती.

“भारतातील लोकांना निरंतर जनविरोधी कायद्यांचे शिकार बनल जातंय. असहमतीचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. ‘फ्रायडे फॉर फ्यूचर, इंडीसाठी काम करणाऱ्या लोकांवर आतंकवादी असल्याचा ठपका ठेवला जातोय. स्वच्छ हवा, पाणी आणि जीवन जगायला पृथ्वी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असू तर या कृतीला दहशतवादी कृती कसं संबोधायचं ” एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिनं हा सवाल उपस्थीत केला होता.

आरोप

दिशावर भारतीय दंड संहीते अंतर्गत राष्ट्र्द्रोह, समाजात दुही माजवणे, वैमनस्य पसरवणे इत्यादी षडयंत्र करण्यासारख्या प्रकरणांअन्वये गुन्हे नोंदवले गेलेत. पर्यावरण विषयक आंदोलनासोबतच तिच्या संस्थेन तलावांची साफसफाई आणि वृक्षतोडीस प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केले होते. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन दिलं, म्हणून सुड बुद्धीने सरकारनं दिशा रवीला अटक केली असा आरोप केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER