शरद पवारांची आशियातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था चर्चेत का?

Sharad Pawar.jpg

सातारा :- देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वांत  मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने चर्चेत आहे. मात्र ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Rayat Shikshan Sanstha) आहेत, त्यांच्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा घेणं आणि त्या डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द शरद पवारांना साताऱ्यात जावं लागणं यावरून या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे (Bhausaheb Karale) यांनी पुण्यात, तर माजी सचिव अरविंद बुरुगले (Arvind Burugale) यांनी साताऱ्यात रयत कौन्सिलिंगच्या बैठकीत राजीनामा सोपवला.

राष्ट्रवादीचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) काल सातारा दौऱ्यावर होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलिंगची बैठक नियोजित होती. शरद पवार हे बैठकीसाठी धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात उपस्थित राहिले. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील विविध विषयांवर चर्चा पार पडली. रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने बुधवारी (१६ डिसेंबर) पुण्यात माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांचा राजीनामा संस्थेने घेतला होता. त्यानंतर काल गुरुवारी झालेल्या बैठकीत या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. सातारा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी सचिव अरविंद बुरुगले यांचाही राजीनामा घेतल्यामुळे, रयत शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा हा प्राध्यापक भरतीचा विषय चर्चेत आला आहे.

मात्र यावेळी शरद पवारांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करीत, अनेकांची कानउघाडणी केली. या प्रकरणावर संस्थेतील कोणीही बोलण्यास तयार नसल्याने, राजीनाम्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गरीब, वंचितांसाठी ज्या शिक्षण संस्थेची कवाडं खुली केली, तीच ही रयत शिक्षण संस्था आशियातील सर्वांत मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र आता या शिक्षण संस्थेत सध्या प्राध्यापक भरती घोटाळ्याचा गंध येत असल्याने, स्वत: पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कर्मवीर भाऊरावांच्या कडक शिस्तीची अदृश्य काठी घोटाळेबाजांच्या माथी बसलीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काही सदस्यांनी घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : मैदानात कोणीही उतरले तरी तुम्हीच निवडून येणार – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER