रसेलला ‘डेथ ओव्हर’मध्येच गोलंदाजी का दिली जाते?

andre russell

कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या मोसमात आंद्रे रसेलचा गोलंदाज म्हणून वापर करताना दिसतेय आणि विशेष म्हणजे त्याला डावातील शेवटच्या ओव्हर्समध्ये म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी दिली जातेय. अर्थात त्याचे कारणही तसेच आहे.

तो ‘डेथ ओव्हर्स’मध्ये प्रभावी ठरतोय. त्याने आतापर्यंत 10 षटके गोलंदाजी केली आहे. त्यातील त्याची सात षटके म्हणजे 42 चेंडू गोलंदाजी डावात 16 व्या षटकानंतर आहे. त्यात त्याचा इकाॕनाॕमी रेट 8.57 असा किफायती तर आहेच, शिवाय त्याने पाच विकेटही मिळवल्या आहेत.

केकेआरने गोलंदाजीत वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले आहेत. सहा ते सात गोलंदाजही वापरून पाहिले आहेत. त्यांच्याकडे गोलंदाजांचे पर्याय चांगले आहेत. त्यामुळे पॕट कमीन्सला सुरुवातीला पूर्ण षटके देण्याचे धाडसही ते करु शकतात आणि शेवटी रसेलसारख्या गोलंदाजाचाही ते वापर करु शकतात.

सीएसके’ विरुध्द रसेल गोलंदाजीला आला तेंव्हा धोनी बाद झालेला होता पण करन, जाधव, जडेजा, ब्राव्हो हे उपलब्ध होते. धावगतीही 13 ची अशी आवाक्यातली होती पण रसेलने आपल्या पहिल्या षटकात त्यांना फक्त तीनच धावा घेऊ दिल्या आणि सामना चेन्नईच्या आवाक्याबाहेर गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER