
छोट्या पडद्याचा बिग टीव्ही शो म्हणून ओळखल्या जाणार्या ‘बिग बॉस’ची फॅन फॉलोइंग खूपच जोरदार आहे. सर्वसामान्यांपासून ते स्टार्सपर्यंत या शोला पसंत करतात. त्याच वेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये बबीता जिची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) बिग बॉसची चाहतीही आहे आणि शोचे बारकाईने अनुसरण करते.
सोशल मीडियावर शोच्या एपिसोडवर मुनमुन अनेकदा मत व्यक्त करते. दरम्यान, मुनमुनच्या नवीन ट्विटवरून असे दिसते की, ती शोचे होस्ट सलमान खान (Salman Khan) आणि शोच्या निर्मात्यावर नाराज आहे. वास्तविक, जेव्हापासून सलमान खानने राखी सावंतच्या बचावावर आणि वीकेंडला अभिनववर प्रश्न केला आहे तेव्हापासून अनेक चाहते सलमान आणि निर्मात्यावर रागावले आहेत. या यादीमध्ये मुनमुनचाही समावेश आहे. मुनमुनने ट्विटमध्ये लिहिले की, ‘अभिनव आणि रुबीना या प्रकरणात कसे वाईट दाखवले गेले हे पाहून दुःख झाले. हे स्पष्ट आहे की, राखीमुळे अभिनव घाबरला आहे; परंतु अद्यापराखीला जास्त बोलले नाही.
प्रत्येक गोष्ट मनोरंजन असू शकत नाही.’ त्याचबरोबर आणखी काही ट्विटमध्ये मुनमुनने लिहिले आहे की, बिग बॉसच्या घरात फक्त निक्की तंबोलीच नाही तर आणखी बरेच सदस्य असे आहेत जे यापेक्षा जास्त उद्धटपणे वागतात. यासोबतच मुनमुनने विकास आणि राहुल यांच्याबद्दलही संताप व्यक्त केला आहे; कारण दोघांनी अभिनवसमोर राखीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मुनमुनचे सर्व ट्विट व्हायरल झाले असून चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उल्लेखनीय आहे की, अलीकडेच राखी सावंतने अभिनव शुक्लाच्या शॉर्ट्सचा धागा खेचला, त्यानंतर रुबीनाने तिला फटकारले. रुबीना म्हणाली की, राखी सावंत हाताबाहेर जात आहे आणि चीप-एंटरटेनमेंट करीत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर ‘वीकेंड का वॉर’ या एपिसोडमध्ये सलमान खान म्हणाला की, रुबीना आणि अभिनव संपूर्ण प्रकरण अधिक ओढत आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दाखवू नये. त्यानंतर सोशल मीडियावर जर कोणी सलमानच्या बाजूने आला असेल तर कोणी त्याच्यावर रागावले आहे.
Nikki Tamboli could be ‘badtameez’ but she is surely entertaining. There are bigger ‘badtameezes’ in the house whose actions are overlooked constantly. All of them should be equally scolded . #BigBoss14
— Munmun Dutta (@moonstar4u) January 30, 2021
So sad to see #AbhinavSukla and #RubinaDilaik getting badly cornered in today’s episode. The guy clear looks traumatised with Rakhi’s behaviour and words. Still Rakhi was left with a little scolding and that’s it. Not everything is entertainment. There’s a thin line #BiggBoss14
— Munmun Dutta (@moonstar4u) January 30, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला