शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय? – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Sharjeel Usmani

मुंबई : “शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय? खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींची तडजोड करणार आहात? यावर तुम्ही टीप्पणी कराल, यांच्याकडे सरकार नाही तर झोप लागत नाही. आमचे अतिशय उत्तम कामे चाचली आहेत. व्यवस्थित सेवा, आंदोलने सुरु आहेत. तुम्ही आम्हाला शिकवू नका. दरवेळी सरकार नाही म्हणून झोप येत नाही, असं गुळगुळीत वाक्य म्हणू नका. कारवाई करणार की नाही ते सांगा”, अशा शब्दांत ठाणकावत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे.

“हिंदू समाज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात मोठ्या संख्येत आहे. कुणीतरी एक मुलगा येऊन काहितरी बोलून जातो. त्यावर समाजाने कारवाई करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे का? याप्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून काहीच कारवाई झालेली नाही. आम्ही कायद्या बाहेरील कारवाई मागत नाहीत. पण कायद्याअंतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही. शरजील उस्मानी (Sharjeel Usmani) हा मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला आम्ही पत्र लिहिलं आहे. आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवले आहे”, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना याबाबत पत्र लिहित शरजीलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार शरजीलवर कारवाई कधी करणार? असा सवाल करत ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER