विनोदी भूमिका करणं कठीण का असतं?

Prajakta Hanamghar

अभिनयापेक्षा विनोदी भूमिका साकारण का जास्त आव्हानात्मक असतात ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं देते अभिनेत्री ” प्राजक्ता हनमघर (Prajakta Hanamghar) ” घडलंय बिघडलंय , शेजारी शेजारी पक्के शेजारी , कॉमेडी ची बुलेट ट्रेन अश्या विविध कॉमेडी शो मधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री! आपल्या विनोदाच्या कौशल्याच्या जोरावर ती काम मिळवत गेली आणि आज एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख संपादन केली.

” विनोदाने मला गंभीरपणे घेतलं “
” हास्याची राणी ” अशी ओळख असणं फार मस्त आहे .  इतकी वर्षे  केलेल्या कामाचं चीज झालंय असं वाटतं म्हणून खूप मस्त वाटत . मी असं नेहमीच म्हणते मी अनेक वर्षे विनोदाला गंभीर पणे घेतलं तर एक वेळ अशी आली विनोदाने मला गंभीर पणे घेतलं .

” कलेसाठी रुईयात गेले ” / ” रुईया आहे खास “
मी शाळेत असल्यापासून अभिनय करत होते तेव्हा पासून  काम करत होते तर कॉलेज मध्ये हे सगळं काम अनुभवण्यासाठी मी खास ” रुईया ” कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं . रुईयात कलेला फार वाव आहे म्हणून मी तिथे जाऊन शिक्षण पूर्ण केलं .

” विनोदाचा गंध सापडला “
मी नेहमी म्हणते माझा बाप प्रोड्युसर नाही त्यामुळे जे रोल येतील त्या उत्तम प्रकारे पार पाडायच्या इतकंच माझ्या हातात होत . विविध काम करताना वेगळ्या भूमिका अनुभवताना मला जाणवलं की आपल्याला विनोदाचा वेगळा गंध आहे म्हणून मी विनोदाकडे वळले. ” घडलंय बिघडलंय ” ही पहिली मालिका करताना मला जाणवलं की आपल्याला विनोद चांगल्या प्रकारे करता येतो , तर इथे माझी आणि विनोदाची गट्टी जमली म्हणून मी विनोदी भूमिका करायला लागली .

” ग्लॅमर मुळे बदल झाला नाही “
अभिनेत्री झाली की नक्कीचं ग्लॅमर येत पण मी तशी फार मातीतली आणि माणसा मधली आहे त्यामुळे या ग्लॅमर मुळे माझ्यात काही फार बदल झाला नाही असं मला वाटतं .

” स्पष्टवक्ती ते प्रेमळ प्राजक्ता “
खऱ्या आयुष्यातली प्राजक्ता खुप स्पष्टवक्ती आहे , खरं बोलणारी , आपल्या माणसावर प्रेम करणारी , कामावर निष्ठा असणारी कामात जीव ओतून काम करणारी , खूप वाचन करणारी , सतत डोळे उघडे ठेवून  सगळ्या गोष्टीकडे बघणारी आहे आणि व्यक्त होणारी आहे .

” प्रासंगिक विनोदावर भर देते “
मला असं वाटतं प्रत्येकात विनोद ओळखण्याचे करण्याचे  गुण कमी जास्त प्रकारात असतात . आता आपण विनोद करू या अर्थाने मी कधीच विनोद करायला जात नाही  असं वाटत खूप छोट्या प्रसंगातून एका तिरकस दृष्टीकोनातून आपोआप विनोद निर्मिती होत असते त्यामुळे ती प्रयत्नपूर्वक करायला मी जात नाही . माझा प्रासंगिक विनोदावर भर आहे .

” आदर्श आहे कारण ….”
माझी पहिली मालिका श्रीरंग गोडबोले सोबत केली त्यामुळे ते माझ्या फार जवळचे आहेत . मालिकेचे लेखक , दिग्दर्शक तेच होते तर या सगळ्या प्रवासात मी त्यांच्या कडून अनेक गोष्टी कळत नकळत  शिकत होते तर त्यामुळे रंगा सरांकडून मी खूप गोष्टी शिकले . सध्या प्लॅनेट मराठी सोबत मी एक नवा चित्रपट करते तर या चित्रपटाचा दिग्दर्शक शंतनू रोडे त्याच्याकडून गेल्या काही दिवसात मी प्रचंड गोष्टी शिकले मी एवढा कामावर प्रेम असलेला त्याच्यासारखा दिग्दर्शक पाहिला नाही आहे . शंतनुची कामावरची निष्ठा आणि कामावरच प्रेम या गोष्टी खूप भारावून टाकतात . या दोन व्यक्ती खूप मस्त आहेत .

” साजेसा रोल मिळाल्याचा आनंद “
प्लॅनेट मराठीच्या ” गोष्ट एका पैठणीची ” या आगामी चित्रपटात मला एक छान रोल मिळाला आहे . मला साजेसा असा हा बेस्ट रोल आहे . प्लॅनेट मराठी सोबत काम करताना छान वाटतंय , प्रत्येक कलाकाराला योग्य त्या सोयी सुविधा प्लॅनेटने उपलब्ध करून दिल्यात आहेत  म्हणून काम करायला खूप मज्जा येते .

माणसात रमणारी तरीही एकांत एन्जॉय करण्यात प्राजक्ताला आवडतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER