भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? संजय राऊत

Governor Bhagat Singh Koshyari - Sanjay Raut

मुंबई :-  राज्यातील मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे . राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .यावरून शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावे.

भाजपशासित (BJP) राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यातच असा प्रयोग का केला जात आहे? आपल्या सरकारचा मुख्यमंत्री नसला की संघर्ष करायचा. राज्यपालांनी राजकारण करू नये, संविधानात राहून काम करावं, असे संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना  म्हटले आहे . “पश्चिम बंगालचे राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्या भूमिकेत काम करत आहेत.

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे? भाजपशासित राज्यांत  मंदिरं का उघडली नाहीत?” असा सवालही त्यांनी विचारला. राजकीय भूमिकेत राहून राज्यपालांनी काम करू नये. पंतप्रधान, राज्यपाल ही सर्व धर्मनिरपेक्ष पदं आहेत. आपली घटनाही धर्मनिरपेक्ष आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याने सर्वांना अडचण होत आहे. कटकारस्थान करून सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल तर मूर्खपणाचं आहे. ज्यांना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असे वाटते, त्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरू नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : भाजपच्या लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्तावाची घाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER