देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का ? – अनिल देशमुख

Anil Deshmukh & Devendra Fadnavis

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हे समजत नाही. यासंदर्भातील राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. परंतु त्यांचे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आले, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत केला.

यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, माझी खुशाल चौकशी करा; माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असे आव्हान दिले. माध्यमांशी बोलाताना फडणवीस म्हणालेत, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे तोंड काले झाले आहे.

यावर गृहमंत्री अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही. यासंदर्भातील राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. परंतु त्यांचे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्याचे नव्हे तर पोलीसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात साथ दिली. त्यांचेच ‘थोबाड काळे झाले’ या प्रकारची भाषा हे वापरू कशी शकतात? आपल्या समाजाचे म्हणून काही आदर्श आहेत. सामान्य माणसाचा कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास त्यामुळे टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आरोप करून सामान्य जनतेचा हा विश्वास डळमळीत करू नका असे मी फडणवीसांना आवाहन करतो.

“अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुंबई पोलिसांचं अक्षरश: थोबाड काळं झाले आहे. ज्यांनी तपास केला त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत. ते गृहमंत्री विसरले आहेत असे मला वाटते. मुंबई पोलिसांपेक्षाही गृहमंत्री यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तो करारा जबाब आहे. तरी मी त्यांना खुले आव्हान दिले आहे. अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी जरूर माझी चौकशी करावी. पण सोबत अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी विकत घेतल्या? याची देखील चौकशी त्यांनी करावी, हे माझे त्यांना खुले आव्हान आहे, असं फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुख यांनी दावा केला की, अन्वय नाईक प्रकरणाबाबत महाराष्ट्र पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आहे. न्यायलयात देखील हा खटला सुरू आहे. पण मला दुःख आहे की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन, त्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांचे तोंड काळे झाले, असे वक्तव्यं केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER