अजितदादा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शांत का? नरेंद्र पाटलांचा सवाल

narendra patil - Ajit pawar - Maharashtra Today

नवी मुंबई : ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय झाल्यास एकत्र येतात. मग मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपले मंत्री काहीच कसे बोलत नाहीत, असा सवाल माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी उपस्थित केला. बीडमध्ये आरक्षणावरून मोर्चाचे आयोजन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाटलांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरक्षणावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

या टीकेला नरेंद्र पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांना प्रत्युत्तर दिले. “अजित पवार तुम्हीही उपमुख्यमंत्री आहात. व्यक्तिशः माझे दादा आहात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का? रायगडावर निघणाऱ्या मावळ्यांवर गुन्हा दाखल होत आहेत. ओबीसी आणि इतर समाजाचे नेत्यांवर अन्याय होत असल्यास एकत्र येतात, मग आपले मंत्री काहीच का बोलत नाहीत.” असा सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारला.

अजितदादांचा नरेंद्र पाटलांवर निशाणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेते नरेंद्र पाटलांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. “काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधानही बघत नाहीत. अशा नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.” असे अजित पवार म्हणाले.

जर सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले असते तर विरोधकांनी श्रेय घेतले असते. यामुळेच भाजप नेत्यांच्या मला राग येतो. तसेच सरकारला सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे सारथी संस्थेसंदर्भात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्टोती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button